शेतातील कुंपणाचा तार व अँगल चोरट्यांनी केले लंपास……

0

🔥आष्टी तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट,पोलीस प्रशासनाचे यावर दुर्लक्ष.

आष्टी शहीद -/ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरी जात असून आष्टी पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी येऊन सुद्धा अद्यापही कोणत्याच चोरट्याचा शोध लागला नाही.सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्याच्या शेतातील शेती विषयक साहित्य चोरी जात असून याबाबत आष्टी पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी झाल्या आहे. दोन दिवसाआधी तालुक्यातील सुसंद्रा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी त असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या मोटारींचे केबल साहित्य चोरीला गेले आहे. दोन दिवस उलटत नाही तर पेठ अहमदपूर येथील रहिवाशी राजेंद्र कुरवाडे शिक्षक यांचे वरुड आष्टी रोडवरील हायवेला लागून असलेल्या शेतातील दिनांक 2 जुलाई 2024 च्या मध्यरात्री दरम्यान शेतातील तार कंपाउंड चे साहित्य तार आणि अँगल चोरट्यांनी लंपास केले या संदर्भात आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे.आधीच वरून राज्याची हवा कृपा असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेंडीचे संकट निर्माण झाले असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे असे शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने पीक जगवण्याचे काम करत असून या शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, मोटर , मोटरला असलेला केबल, स्पिंकलर नवजल असे साहित्य चोरटे रात्री दरम्यान जाऊन चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. मात्र या चोरीच्या प्रकरणाकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने चोरटे राजरोसपणे चोरी करीत आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीकडे पोलीस एक प्रकारे दुर्लक्ष करून वेळ मारून नेत आहे.सदर चोरीचे प्रकरण वाढत असल्याने यावर पोलीस प्रशासनाने शोध मोहीम सुरू करून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.

नरेश भार्गव साहसिक news -/24 शहीद आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!