अवेळी येणाऱ्या बसचा केला मुलांनी रस्ता रोको….

0

🔥पोरगव्हाण पंचाळा येथील घटना

🔥दहा वाजताची बस येते दीड वाजता.

🔥शाळेत जायला मिळत नसल्याने मुलांमध्ये रोष.

आष्टी शहीद -/ तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या पोरगव्हाण ,पंचाळा या गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केला बस स्टॉप परिसरात बस समोर बसून रस्ता रोको.
पोरगं आणि पंचाळा हे गाव डोंगराळ भागात बसल्याने या दोन्ही गावातील विद्यार्थी आष्टी येथे शिक्षण घेण्याकरिता हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आणि लोकमान्य विद्यालय या ठिकाणी पाचवी ते उच्च शिक्षण घेण्या करिता विद्यार्थी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तळेगाव डेपोची बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाता येत नसल्याने दररोज विद्यार्थ्यांची शाळा पडत आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी दीड वाजता आलेल्या बसला थांबवून तिच्यासमोर बसून गाडी सोमवार जाण्यास मज्जा केला . त्याच वेळेस आलेल्या पोलीस स्टेशनच्या गाडीतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समज दिला याप्रसंगी गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर बस वेळेवर आली नाही तर आम्ही पुन्हा असाच रस्ता रोको करेल आणि पुढे बस जाऊ देणार नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता वेळेवर बस पाठवण्याची मागणी केली असून यापुढे असे झाले तर गावातून बसत जाऊ देणार नाही असा इशारा दिला.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!