चिकलठना हद्द पोलिसांची ऑनलाइन जुगार अड्ड्यावर धाड….

0

बिडकीन,पैठण -/ रोडवरील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेवराई येथील एका कंपनी समोरील गाळ्यामध्ये बऱ्याच दिवसापासून खुलेआम व पोलीसांचा कुठलाही धाक नसल्याचे भासून ऑनलाईन चक्री जुगार अड्डा चालत होता . पोलीसांना याची माहिती मिळाली यावरून चिकलठाणा पोलीसांनी गेवराई एका कंपनी समोरील ऑनलाइन जुगार अड्ड्यावर दि १७ बुधवार रोजी दुपारी साडे चार वाजता धाड टाकून ऑनलाईन जुगार चालवणारे सहा जणांना अटक करून त्यांनाच्याकडून ऑनलाइन जुगार खेळल्या जाणारे साहित्य एलईडी, सीपीयू, किबोर्ड माऊस प्रत्येकी पाच, बॅनर, पाट्या असे जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून यांच्या कडून एकूण रोख बारा हजार पन्नास रुपये असे मिळुन एकूण २६३, ०५० दोन लाख त्रेसष्ट हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस हवालदार चरणसिंग भोपाळवत पोलीस ठाणे चिकलठाणा यांच्या फिर्यादीवरुन , प्रमोद वसंतराव थोरात रा गेवराई तांडा ता जि. छत्रपती संभाजीनगर, सुभाष देवराव केदारे रा गेवराई , ता जि. छत्रपती संभाजीनगर., छोटू प्रेमसिंग जाधव रा गेवराई अलाना ता जि छ. संभाजी नगर, कृष्णा कवरसिंग राठोड , विकास विलास राठोड ,विकास भास्कर बनकर व तेथील गाळे धारक रा. गेवराई ता जि छ. संभाजी नगर वाजता एका कंपनी समोरील रोडवर मोकळ्या गाळ्यामध्ये गेवराई कंपनी समोर येथे, ता.जी छत्रपती संभाजीनगर दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहे.

 अर्षद शेख साहसिक news -/24 बिडकीन पैठण 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!