तुळजापूर येथील धाम नदी ला आला पूर.लक्ष्मी मंदिरात घूसले पुराचे पाणी….

0

तुळजापूर वघाळा -/ सर्वञ जोरदार पाऊस झाल्यामुळे धाम नदीच्या दोन्ही कडा भरून पुराचे पाणी वाहत असून आज सकाळी 7 वाजता पासून सततधार पाऊस सुरू आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.धाम नदी वरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परीसरात काल सकाळ च्या सुमारास दिड ते दोन तास सारखाच जोरदार पाऊस बरसला होता. धाम नदीच्या कडा भरगच्च वाहत होत्या..शेती काम ठप्प झाले होते..चालू हंगामात सुरूवातीला साधारण पाऊस झाला होता.पण आजघडीला मुसळधार पाऊस झाल्यामुळे धाम नदीच्या तीरावर वसलेल्या लक्ष्मी माता मंदिर पुराचे पाणी परीसरात पूर आल्यामुळे घुसले या प्रसंगी तरूण सेवकांनी येथील साहीत्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. परीसरात संततधार पाऊस सुरू असल्याने आणखी पूर वाढू शकते अशावेळी धाम नदीच्या काठावरील शेती पिक पाण्याखाली जावू शकते. पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

गजानन जिकार साहसिक news-/24 तुळजापूर,वघाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!