🔥उघडपणे होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे शालेय मुलीवर हल्ला झाला,पोलिसांचे मात्र दुर्लक्ष.🔥मोई तांडावरून दारू विक्री नसतांना दोन किलोमीटर अंतरावर आबाद किन्ही येथे उघडपणे दारू विक्री आबाद किन्ही गावातील घटना.🔥आष्टी पोलीस स्टेशनला कोणताही निर्भया पथक नाही ना महिला पोलीस अधिकारी नाही.
🔥किमी गावात राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात.
आष्टी शहीद -/तालुक्यातील आबाद किन्ही येथे ३० ऑगस्ट रोजी आष्टी येथून सायंकाळी पाच वाजता लालपरी ही शालेय मुला मुलींना घेऊन मोई गावाकडे जाण्यासाठी निघाली आणि किन्ही गावात मुले मुली उतरत असताना किन्ही गावातील तीन ते चार समाज कंटक बस मध्ये घुसले आणि मोई गावातील मुलींना मारहाण करू लागले,मुलीसोबत छेडखानी करण्यात येते आहे हे पाहून बस चालकाने बस मोई गावात न नेता पोलीस स्टेशनं मध्ये नेऊन तक्रार दिली.यां घटनेची माहिती मोई गावात येताच पालकांनी किन्ही गावं गाठून समाज कंटक व दारू विक्रेते यांच्या घरावर हल्ला करून एकाला चोप दिला.सविस्तर असें कि,
आष्टी तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या मोई,किन्ही गावाकडे जाण्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी शालेय मुला मुलींना ऐ जा करण्यासाठी लालपरी ची व्यवस्था करण्यात आली.२९ रोजी आबाद किन्ही येथील तीन जनाने बस घुसून राडा केला होता.याकडे दुर्लक्ष करण्यात आले,३० आगस्ट रोजी आष्टी बस स्टॅन्ड परिसरात शालेय मुले मुली बस मध्ये बसल्यावर मोई गावाच्या दिशेने बस निघाली,व किन्ही गावं आल्यावर बस थांबली विध्यार्थी खाली उतरत असताना किन्ही गावातील समाज कंटक बसमध्ये घुसले आणि शालेय मुला मुलींना मारहाण करून छेडखानी करू लागले ही घटना मोई गावातील पालसिंग पवार पाहत होते.पालसिंग पवार यांनी हटकले तर त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यावेळी किन्ही गावातील महिला व दहा ते बारा गावागुंडाचा समावेश होता.बस चालकाने समय सूचकता दाखवत बस ला मागे पुढे करित आष्टी च्या दिशेने घेऊन गेले.व लालपरी आष्टी पोलिस स्टेशनं मध्ये जमा करून घटनेची फिर्याद दिली.मात्र मुली व मुले घरी आले नाही म्हणून पालक वर्ग चिंतेत होता.मोई गावातील नागरिकांनी किन्ही गावात धाव घेत मुलींना मारहाण करणाऱ्याचा शोध घेत त्यांच्या घरावर हल्ला केला.यां हल्ल्यात दारू विक्रेत्याचा घरात नासधूस करण्यात आली.तसेच एकाला चांगला चोप दिला तर दोघे पळून गेल्याने दुर्घटना टाळली.मोई गावातील जमावावर किन्ही येथील काही तरुणांनी हल्ला केला.यां हल्ल्यात काठ्या चा ही उपयोग करण्यात आला होता.
यां घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली मात्र आष्टी पोलीस हे बंदोबस्त वर होते त्यामुळे उशिरा घटना स्थळी पोलीस पोहचले.
पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवडे, विनायक घावट,व इतर तीन पोलीस कर्मचारी किन्ही गावात पोहचले तेव्हा जमाव शांत झाला.आणि थेट दोन्ही गावातील नागरिक व महिला पोलीस स्टेशनं मध्ये पोहचल्या.पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेराव हे आष्टी येथे आले.दोन्ही गावातील नागरिकांनी एक मेका विरोधात तक्रारी दिल्या.काही काळ यां ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.दोन्ही गावातील आरोपी ची संख्या ही वीस च्या वर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यां प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे तपास करित आहेत.किन्ही गावात तणाव, राखीव दल पोलिसांची तुकडी तैनात मोई गावात जाण्यासाठी पहिले किन्ही हे गावं गाठावे लागते.त्या गावातील काही उपदर्वी हे रस्ता अडवून मारहाण करण्याची भीती लक्षात घेता किन्ही गावात राखीव दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.किन्ही गावात अवैध दारू विक्री बंद करा गावाकऱ्याची मागणी किन्ही गावात घरोघरी दारू विक्री ची दुकानें असून यातून दारुडे हे लालपरी त घुसून हल्ला करतात.अवैध दारू विक्री व्यवसाय बंद करा ही मागणी बरेच दिवसापासून आहे.याकडे मात्र पोलीस दुर्लक्ष करतातं अशी आपबीती माजी उपसरपंच किसन महाराज चव्हाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे केली.