“हे तर माझे कर्तव्यच..!”-सुमित वानखेडे…

0

🔥बार असोसिएशनने केला सुमित वानखेडेंचा सत्कार.🔥बार असोसिएशनची प्रलंबित मागणी वानखेडेंनी योग्य पाठपुराव्याने काढली निकाली.

आर्वी -/ सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांने आर्वीत वरिष्ठ न्यायाधीश न्यायालयाचा वरिष्ठ स्तर स्थापनेस मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्याचे बार असोसिएशन आर्वीच्या पदाधिकाऱ्यांना कळताच सुमित वानखेडेंची सदिच्छा भेट घेऊन त्यांनी मनस्वी आभार प्रगट केले. सद्यस्थितीत आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील वकिल मंडळींना तसेच पक्षकारांना कोर्टाच्या केसेस साठी वर्धेला जावे लागत होते.या निर्णयानंतर आता वकिलांसह पक्षकारांना कोर्ट कामानिमित्ताने वर्धेला हेलपाटा टळणार आहे. त्यामुळे बार असोसिएशनने सुमित वानखेडे यांच्या निवासस्थानी त्यांचा यथोचित सत्कार करून आभार मानत बहुप्रतीक्षित मागणी पुर्ण झाल्याने आनंद व्यक्त केला. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार बार असोसिएशनने मानले आहे.बार असोसिएशनने केलेल्या सत्कारा बद्दल सुमित वानखेडे यांना विचारले असता त्यांनी हे तर माझे कर्तव्यच आहे. माझे कर्तव्य मी पार पाडण्याचे काम करतो. नागरीकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पुर्ण केल्याने मला समाधान मिळते. त्यामुळे त्या मी निरंतर पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. बार असोसिएशनचे पदाधिकारी या मागणी संदर्भात मला भेटले असता मी त्यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घडवून आणली व वरिष्ठ न्यायालय आर्वी येथे होणे का गरजेचे आहे हे समजावून सांगितले. त्यावेळी देवेंद्रजींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर मागणी मान्य झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त करत यामुळे वर्धेला जावे न लागल्याने वकिल आणि पक्षकार असा सर्वांचाच वेळ, श्रम व पैसे वाचतील असे सांगितले.सत्कार करतेवेळी ॲड.व्हि.टि.देशपांडे,ॲड. रमेश धारस्कर,ॲड.एम.सी.गहलोत, ॲड.अवतारसिंग गुरुनासिंगानी,ॲड. हरीश कोडवाणी,ॲड.मंगेश करडे, ॲड. प्रसाद देशमुख,ॲड.किसन मनुजा,ॲड. रवींद्र गुरुनासिंगानी,ॲड. स्वप्निल भुसारी,ॲड.मिलिंद राऊत, ॲड. विशाल वधवा, ॲड. रवी चैनानी, ॲड. संजय तिरभाने, ॲड. रोहित राठी, ॲड. श्रद्धा धारस्कर, ॲड. जितेश काळपांडे यांच्यासह अटरनी आकाश सोळंके, राजू डोंगरे, रवी मुरतकर, सतीश गाडबैल, लोकेश, अतुल खरपे, गोपाल चिकाटे इत्यादी उपस्थित होते.

राजू डोंगरे साहसिक news -24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!