हिंगणघाट येथे सामूहिक नमाज पठण करून ईद उत्साहात साजरी…

0

हिंगणघाट -/ पवित्र रमजान सण काल दि.३१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रमजान ईद निमित्त शहरातील टाका ग्राउंड ईदगाह तसेच निशानपुरा ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून नमाज अदा केली.यावेळी परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने नमाज साठी उपस्थिती दर्शविली. नमाज पठण झाल्यानंतर देशामध्ये शांतता, काय्दा व सुव्यवस्था, भाईचारा अबाधित राहण्यासाठी दुआ करण्यात आली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर बाबु कोठारी, माजी आमदार राजूभाऊ तीमांडे, इंटक सेक्रेटरी आफताब खान, शिवसेना उबाठा गटाचे सतीश धोबे, मनीष देवळे, राजेंद्र खूपसरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल बोरकर हे त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते , तसेच विदर्भ विकास, आप पार्टीचे अनिल जवादे,शंकर मुजेवार, माकडे सर, अनेक कार्यकर्त्यांनी तसेच हिंदू बांधवानी तसेच राजकीय क्षेत्रातील सर्वांनी मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कायदा व शांततेच्या अनुषंगाने ईदगाह परिसरात पोलीसांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर व सर्व पोलीस कर्मचारी यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!