🔥आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तारासावंगा येथील प्रकाश ढोमणेंचा भाजप मध्ये पक्षप्रवेश.
आष्टी(श.) -/मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांदन रस्ते योजणे अंतर्गत साहूर परिसरातील सत्तरपुर,वडाळा,वर्धपुर,साहूर व तारासावंगा या गावांमध्ये शेत पांदन रस्त्यांचे भुमिपुजन आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याचाच एक क्षेत्र भेट समारोपीय कार्यक्रम म्हणून तारासावंगा येथे आमदार सुमित वानखेडे यांचा नागरी सत्कार देखील करण्यात आला.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तारासवंगा येथील नावजलेले प्रकाश ढोमणे पाटलांनी आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रवि हेडाऊ,रामदास नरंगे,विठ्ठल गोरले,सुरेंद्र गुरुमुळे आदी सहकार्यांनीशी भाजप मध्ये जाहीर पने पक्षप्रवेश केला.आर्वी विधानसभेतील शेतकरी समृध्द व्हावे.शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वहीवाटीचे रस्ते चांगले व्हावे यासाठी आपण काम करत असुन,आष्टी तालुक्यातील ५७ किमी पांदन रस्ते बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.व भविष्यातही मोठ्या प्रमाणात पांदन रस्ते मंजुर करुन आनत शेतकऱ्यांसाठी आपल्याला खुप काम करायचे असुन,आपल्या भागातील शेतकर्यांना समृध्द करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार सुमित वानखेडे यांनी केले.शेतातशेतमाल पोहोचविण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच बाब लक्षात घेऊन आमदार सुमित वानखेडे यांनी “मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद रस्ते योजने अंतर्गत” ५७ कि.मी. च्या पांदण रस्त्यांना मंजुरी मिळवुन दिली आहे.आष्टी तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांदन रस्ते योजणा एकदम धडाक्यात राबविल्या जात असुन,५७ कि.मी. शेत पांदन रस्त्यांचे प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांकडून आमदारांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहे.यावेळी कार्यक्रमाला तारासावंगा येथे आमदार सुमित वानखेडे,भाजपा तालुकाध्यक्ष सचिन होले,विजय वाजपेयी,कमलाकर निंभोरकर,प्रशांत वानखेडे,अशोक विजयकर,प्रशांत काकपुरे,प्रकाश ढोमणे,मनिष ठोंबरे,अजय लोखंडे,श्रीराम ठोंबरे,शकुंतला हेडाऊ,शितल खंडाळे,गोविंद खंडाळे व अन्य भाजप प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संचालन साईल ठाकरे,प्रास्तविक कमलाकर निंभोरकर तर आभार अजय खरडे यांनी मानले.