राष्ट्रीयस्तरीय जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनीकरिता जि.प.उच्च प्राथ.शाळा, शिरपूर बोके ची ऐतिहासिक भरारी….

0

🔥राष्ट्रीयस्तरीय जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनीकरिता जि.प.उच्च प्राथ.शाळा, शिरपूर बोके ची ऐतिहासिक भरारी.

शिरपूर -/ नुकतेच डिसेंबर 2025 ला जिज्ञासा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 संपन्न झाले.सदर विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी गटांतर्गत महाराष्ट्र राज्यातील निवड प्राप्त विज्ञान प्रतिकृती समाविष्ट झालेल्या होत्या.
यामध्ये वर्ग 6 ते 8 प्राथमिक विद्यार्थी गटांतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा,शिरपूर मराठी पंचायत समिती आर्वी जि.वर्धा येथील विद्यार्थीनी तन्वी विलास सपकाळ व खुशी सचिन बोरकर यांनी सादरीकरण केलेल्या आरोग्य व स्वच्छता या विषयांतर्गत रोड क्लिनर या विज्ञान प्रतिकृतीची राष्ट्रीयस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तिसऱ्या क्रमांकाने निवड झाली. सदर प्रतिकृती ही बेंगलोर येथे राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात समाविष्ट होणार आहे.
या भरघोस यशाबद्दल विद्यार्थीनी तन्वी विलास सपकाळ व खुशी सचीन बोरकर, मार्गदर्शक शिक्षक मारोती विरुळकर,गुणवंत तिनघसे, सुरेश जवंजाळ,वैशाली सातपुते यांचे जि.प.वर्धाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजबीये,डायट प्राचार्य डॉ.मंगेश घोगरे,प्रा.नवले,प्रा.सीमा पुसदकर, गशिअ पकंज तायडे, पदमा तायडे,अजय इंगोले,गीता मानमोडे,केंद्रप्रमुख लता कपले, संजय कोचाडे, विजय लोणारे, विलास तराळे, महाजन,बोराडे, शा. व्य.समिती अध्यक्ष उमेश केलव, सुधीर बोकडे,घनश्याम लाधे, विलास घोडे, अकबर शहा,माधुरी बावणे,मंगला गोपाळे,सुवर्णा मोकलकर,प्रतिभा काळे,
आरती काळे, शिल्पा लाधे व समस्त गावकरी यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.परिसरात या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!