Cm Uddhav Thackeray Resign : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Byसाहसिक न्युज 24
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला.
बहुमत चाचणीआधीच राजीनामा
सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार होती. मात्र या बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.