The husband killed his wife : पतीनेच केली पत्नीची हत्या

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/नाशिक:
नाशिक जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच आहे.यामध्ये घरगुती वादातून, किरकोळ वादातून, खून होत आहेत. यामध्ये लहान मोठ्यापासून अगदी वृद्धांपर्यंत हे प्रकरण घडते असल्याचे बघावयास मिळत आहे. अशाच एक प्रकार आज नाशिक जिल्ह्यात घडला आहे. यामध्ये पतीनेच आपल्या पत्नीला गळफास देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथे मध्य प्रदेश मधील शेतात कामासाठी आलेल्या मजूर पत्नीला तिच्या पतीनेच गळफास देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणात लासलगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांनी फरार झालेल्या आरोपी पतीला अवघ्या एक तासाभरात ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घडलेल्या घटनेची सविस्तर वृत्त असे की मानोरी खुर्द तालुका निफाड येथील अंबादास आंबेगाव यांचा शेतातील ग्रीन हाऊस मध्ये मध्य प्रदेश मधील काही शेतमजूर कामासाठी आले होते .त्यांपैकी आशा प्रेमा वासकले वय 32 राहणार तिरी तालुका सेगाव जिल्हा खरगोन मध्य प्रदेश राज्यातील महिलेचा आज सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत मानोरी खुर्द येथील पोलीस पाटील रतन भवर यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली .
यानंतर या महिलेचा पती प्रेमा इडा वासक ले यांनी तिच्याच साडीने गळफास देऊन पत्नीची हत्या केली असून तो फरार असल्याचे तिचे मामा ध्यानसिंग मेथू चव्हाण वय 45 याने माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह माधुरी कांगणे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी केलेल्या तपास सूचना व मार्गदर्शनानुसार येवला येथील पोलीस ठाणे अंमलदार आबा पिसाळ यांच्या मदतीने येवला शहर येथून आरोपी पतीस अवघ्या एका तासाभरात ताब्यात घेण्यात आले. या घटने दरम्यान मयत महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिचा पती प्रेम इडा वासकले याचा विरुद्ध भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचा मार्गदर्शनाखाली एल के धोक्रट संदीप शिंदे, औदुंबर मुरडणर हे अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!