Warm Water: गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

0

Warm Water Effects: शरीराचं वाढतं वजन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. काही जण डाएट फॉलो करून अन्नावर नियंत्रण ठेवतात. तसेच काही जण व्यायाम करत घाम गाळून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण यापैकी कोमट पाणी पिणं हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं बोललं जातं. वजन कमी करण्यासाठी अनेक जण गरम पाणी पितात. पण वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणं खरंच प्रभावी आहे का? गरम प्यायल्याने शरीराला काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात.

पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. गरम पाणी तुमचे शरीर डिटॉक्स करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. गरम पाणी प्यायल्याने चयापचय क्रियाही चांगली राहते आणि भूक कमी होते. अन्न खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या दूर होतात.

रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर गरम पाणी पिणे वजन कमी करण्यात फायदेशीर मानले जाते. गरम पाणी रोज सकाळी प्यायल्यास चरबी जाळते. जेवणानंतर गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते आणि चरबी नियंत्रणात राहते. कोमट पाणी रोज रिकाम्या पोटी प्यायल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

गरम पाण्यामुळे होणारं नुकसान!

1. जास्त गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. त्यामुळे कधी-कधी मेंदूच्या नसांवरही परिणाम होऊन डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

2. गरम पाणी पिण्याने शरीर डिटॉक्स होते, परंतु जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते.

3. गरम पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. साहसिक News24 याची पुष्टी करत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!