नरेश भार्गव,आष्टी शहीद /तालुक्यातील माणिकवाडा गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अतिप्रसंग केल्याची घटना तारासावंगा जंगलात घडली.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 6 एप्रिल 2024 ला आरोपी मंगेश उत्तम ठाकरे वय 30 वर्ष राहणार माणिकवाडा तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथील आरोपी असून या आरोपीने गावातीलच अल्पवयीन मुलीला 10 वाजताच्या सुमारास गावातीलच हॉटेलमध्ये नेऊन भजे चारून स्वतःच्या जनावरा करिता चारा आणायचा आहे असा बहाणा करून माणिकवाडा लगतच असणाऱ्या तारासावंगा रोडवरील जंगलात नेऊन हातपाय बांधून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली असून यासंदर्भात आष्टी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी मंगेश उत्तम ठाकरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार, उप पोलीस निरीक्षक राजेश उंदीरवाडे, उप पोलीस निरीक्षक आदिनाथ दौड, पोलीस कर्मचारी अमित झुवारे, राजेश पाटील, मंगेश भगत, विनायक घावट तपास करीत आहे.