आदिवासीनों नुसत्या आरक्षणाच्या आधारावर मुलामुलींचे उज्वल भविष्य बघु नका,आदिवासी नेते अवचितराव सयाम…
वर्धा : आदिवासी पालकांनों नुसत्या आरक्षणाच्या भरवशावर आपल्या मुलामुलींचे उज्वल भविष्य बघु नका.त्यांना जगाच्या स्पर्धेत उतरु द्या.त्यांना जिवनातील अनेक स्तरावरील शिखर गाठण्यासाठी त्यांच्या अंगी कौशल्य निर्माण करण्याच्या संधीचा फायदा घेऊ द्या ,अश्या प्रकारचे संबोधन आदिवासी नेते मा.अवचितराव सयाम यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विध्यार्थी पालक मेळाव्यात स्वं. लक्ष्मणराव मानकर ( गुरुजी ) आदिवासी प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक आश्रमशाळा वडगांव जंगली, तह सेलु, जिल्हा वर्धा येथे केले आदिवासी विकास विभागाच्या वतीने आश्रमशाळेतच उन्हाळ्याच्या सुट्टीत आदिवासींच्या मुलामुलींना विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन त्यांच्या पुढील शैक्षणिक जिवनासाठी विनामुल्य दिले जाते ,परंतु अज्ञानी- अशिक्षीत आदिवासी पालक उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या पालकांना घरी घेवुन जात असल्याने आदिवासींचे अनेक होतकरु मुलें मुलीं शिक्षणापासुन वंचीत राहतात. हे फार मोठे दुर्दैव आहें.आजकाल शिक्षण घेण आर्थिकदृष्ट्या भयंकर महाग झाले असतांना आदिवासी पालक शिक्षणाचे महत्व पाहिजे तेवढ्या प्रमाणात समजु शकत नसल्याने आदिवासींची पुढच्या पिढीचे जीवन अंधारमय होईल की काय ? अशी भिती त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.या कार्यक्रमात प्रकल्प स्तरिय ,जिल्हा स्तरिय, राज्य स्तरिय, क्रिडा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खेमराज भोंगे होते तर प्रामुख्याने ॲड. चेतन सयाम,संस्था उपाध्यक्ष कु. प्रेषिता कनेर,संचालिका श्रीमती वर्षा कनेर , आदिवासी विकास विभागाचे डोंगरेजी व पालक वर्ग तसेच संस्थेतील सर्व शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते .संचालन प्रा. प्रफुल्ल वाघ यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक कर्मचारीवृंद व विध्यार्थी सर्वांनी सहकार्य केले.
साहसिक न्यूज/24 वर्धा