आर्वीच्या मूळ आस्थापनेवरील तलाठी स्वीय साहाय्यक कसा ?
Byसाहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
आर्वीच्या मूळ आस्थापनेवर असणाऱ्या तालाठ्याला बदलवून प्रोटोकॉल चुकल्याची तंबी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी बदलताच पुन्हा तोच तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीय सहाय्यक म्हणून रुजू झालाय. ही बदलीच बदलविणारा कोण? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशी आपली प्रतिमा जपून असलेल्या वर्ध्याच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली होती. मात्र त्यांची बदली होताच काही तलाठी आपला सांझा सोडून कार्यालयात हस्तक्षेप करीत उठाठेवीची कामे करायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी देशभ्रतार यांच्या काळात सर्व कामे नियमात व्हायचे मात्र आता बदली होताच पेट्रोल परवाना देण्याच्या कामाला गती आली असल्याचं कर्मचाऱ्यांकडून बोललं जातं आहे.
आर्वी येथे कार्यरत असलेला तलाठी वर्ध्यात काय करतो? शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे सोडून येथे कोणाच्या आदेशाने आला? लेखी आदेश नसतांना ही तोंडी आदेशावर येऊन कसा काय सरकारी कामात हस्तक्षेप करू शकतोय? या तलाठ्याला कोणी अधिकार दिला? असाच सवाल उपस्थित होत आहे. या तलाठीपासून अनेक त्रस्त झाले असल्याची कार्यालयात चर्चा? प्रमोशन झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना चांगली ठिकाणी बदली पाहिजे असेल तर यांना का भेटावे लागते? यांचा नवीन जिल्हाधिकारी शोध घेऊन चौकशी करणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. जिल्हा कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी श्री. अनिल अवताडे यांची तडकाफडकी मूळ आस्थापनेवर बदलीचे आदेश निर्गमित केले होते. परंतु जिल्हाधिकारी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाल्याबरोबरच श्री.अवताडे यांना पुनःश्च जिल्हाधिकारी कार्यालयात कामावर बोलविण्यात आले आहे. मात्र यासाठी त्यांचा कोणताही आदेश काढला नसल्याची चर्चा आहे.कोणत्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने हा तलाठी येथे आला? याचा शोध घेणे गरजेचे आहे. तलाठी कर्मचारी ज्यांची मूळ आस्थापना आर्वी तहसील असून जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांचे सहाय्यक म्हणून कामं करतात या वरून सम्पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात कोणताही कर्मचारी निवासी उपजिल्हाधिकारी यांचा सहायक म्हणून कामं करण्यास सक्षम नाही का? आता हा सवाल उपस्थित झाला असून नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आता प्रकरणाकडे लक्ष देऊन त्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.