आष्टी येथील विविध कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडुन वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आष्टी शाखेला पाच लाखाचा धनादेश देऊन सक्षमीकरणाची सुरूवात.
आष्टी (शहीद) : येथील विविध कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडुन कारंजा येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक संदिप भारती आणि आष्टी येथील सहकार अधिकारी (श्रेणी-१) श्री धोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत “सहकारी बँक सक्षमीकरण” या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये यावेळी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सक्षमीकरण करण्यावर चर्चा करण्यात आली,असता बैठकीत विविध कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सर्व उपस्थीत संचालकांनी सहकारी बँकेला पाच लाखाचा निधी देऊन बॅक सक्षमीकरण करण्यासाठी हातभार लावण्याचे ठरविले.या अनुषंगाने वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आष्टी शाखेचे व्यवस्थापक व्ही.पी.कडु यांच्या कडे पाच लाखाचे निधीचा चेक देऊन सहकारी बॅक सक्षमीकरण करण्याची सुरवात करण्यात आली.यावेळी सभेला विविध कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप होले, सचिव मोरेश्वर गायकी, उपाध्यक्ष गिरीश आजणे,तसेच सर्व संचालक उपस्थित होते.
नरेष भार्गव साहसिक न्यूज/24 शहीद आष्टी