🔥(श्रेयस माळीकर) गंभीर जखमी एकाच रात्री वेगवेगळ्या अपघातात दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला.🔥(मृतक अद्वेद माळीकर)एकाचा रेल्वे अपघातात मृत्यू ,तर दुसरा अपघातात गंभीर.
वणी -/एकाच रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन सख्या भावांवर काळाने झडप घातली.नायगाव रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत धाकट्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर काही तासांतच मोठा भाऊ रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला.ही गंभीर घटना शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विद्यानगरी कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे.अद्वैद विजय माळीकर (२७) असे मृत धाकट्या भावाचे नाव आहे. तर श्रेयस विजय माळीकर (३०) असे अपघातात गंभीर जखमीचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास वणी पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव शिवारात रेल्वेने अद्वैदला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत अद्वैदचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला मृताची ओळख पटली नसल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते, मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर तो विद्यानगरीतील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.ही घटना ताजी असतानाच त्याच रात्री दुसऱ्या एका घटनेत अद्वैदचा मोठा भाऊ श्रेयस हा निळापूर ब्राह्मणी रस्त्यावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.सध्या श्रेयसवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.अद्वैद माळीकर याचा मृत्यू हा निव्वळअपघात आहे की त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.वणी पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलांवर काही तासांच्या अंतरात हे भीषण संकट कोसळल्याने वणी शहरात आणि माळीकर कुटुंबाच्या मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस या दोन्ही घटनांचा अधिक तपास करत आहेत.