🔥हाच तो कटकरस्थानी खबरी युनूस शेख.🔥युनूस शेख चे मार्गदर्शक ठाणेदार केशव ठाकरे.🔥आरोग्य सभापती नगर परिषद आर्णी अन्वर पठाण.
🔥कट कारस्थान रचून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई ची मागणी.
(आर्णी) जाकीर सोलंकी -/ अनवर खान सरदार खान पठाण आरोग्य सभापती नगर परिषद आर्णी हे मागील पंधरा वर्षांपासून आर्णी नगर परिषद मध्ये नगरसेवक आहे आणी आर्णी शहरामध्ये जनसेवक (समाजसेवक) म्हणून प्रतिमा आहे.काही दिवसापूर्वी आर्णी बस स्टेशन जवळ युनूस शेख व शब्बीर खान यांच्यात् सुरु असलेल्या बाचाबाचीतून कळाले त्याचं बाचाबाचित युनूस शेख ला शब्बीर खान ने तु अनवर पठाण ला पण खोट्या गुन्हात अडकविण्याचा कट रचला होता.हे वाक्य त्या ठिकाणी हजर असलेल्या माझ्या मित्राने मला सांगितले.त्यानंतर मी शब्बीर खान लाला खान यांना प्रत्येक्ष भेटून संपर्क साधला असता माझ्याविरोधात रचलेला कट कारस्थानाची संपूर्ण माहिती मला शिब्बीर खान लाल खान यांनी दिली.
मोहदय,मागील एक ते दीड वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणेदार केशव भीमराव ठाकरे यांचा एका कुरियर बॉय ला अश्लील शिवीगाळ व मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रसार माध्यमावर प्रचंड वायरल झाला होता.त्या व्हिडिओची दखल घेउन् सन्मानीय पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ यांनी केशव ठाकरे यांची आर्णी येथून उचलबांगडी केली होती.सदर व्हिडिओ वायरल प्रकरणात माझा तिळमात्र ही सहभाग नसतांना,माझ्यावर आपल्या मनात शंका घेऊन माझ्या विरोधात सध्याचे घाटंजी ठाणेदार केशव ठाकरे व शेख युनूस शेख गणी रा आर्णी या दोघांनी समन्वय करून मला गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट मागील सहा ते आठ महिन्यापासून सुरु आहे.याची माहिती मला शब्बीर खान लाल खान पठाण रा शास्त्री नगर आर्णी यांच्या कडून माहिती मिळाली.
मोहदय,शेख युनूस शेख गणी हे केशव ठाकरे आर्णी येथे ठाणेदार असतांना केशव ठाकरे व अव्वेध धंदे करणारे लोकांमध्ये व पोलीस स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकरणात आर्थिक तडजोड करण्याचा काम करत होता.मागील सहा ते आठ महिन्या मध्ये शेख युनूस शेख गणी यांनी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेऊन.दोन ते तीन वेळा माझा पाठलाग ही केला होता.पण त्यावेळी या गोष्ठीवर मी जास्त लक्ष दिला नाही.पण आज रोजी पाहता युनूस शेख याचा माझा पाठलाग करण्याचा उद्देश माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा उद्देश होऊ शकते.याला नाकारता येत नाही.मोहदय,केशव ठाकरे व युनूस शेख हे हे दोघेही सतत फोन द्वारे व प्रत्येक्ष भेटी द्वारे एक मेकाच्या संपर्कात राहते.केशव ठाकरे व युनूस शेख हे दोघे मिळून काही ही कट कारंस्थान रचून मला खोट्या गुन्ह्यात अडकवून माझी प्रतिमा मलीन करून माझा राजकीय व समाजिक जीवन उधवस्त करण्याचा व मला जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकते.याची मला शंका आहे.तरी माझ्या जीवाचा काहीही बरे वाईट झाल्यास याचा पूर्णपणे जबाबदार केशव भीमराव ठाकरे घाटंजी ठाणेदार व शेख युनूस शेख् गणी रा. मेमन मस्जिद जवळ आर्णी हे राहणार हे मी या पत्राद्वारे आपल्या निर्दक्षणात आणून देत आहो.तरी आपल्या स्तरावर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असा जबानी रिपोर्ट अन्वर भाई पठाण यांनी आरनी पोलीस स्टेशनला दिलेला आहे.(क्रमशः)