कॅनल मध्ये पडून युवकाचा मृत्यू,नांदोरा डफरे शिवारातील घटना.

0

मृतक नांदोरा डफरे येथील युवक भरत बेलचाटे

देवळी : तालुक्यातील नांदोरा डफरे येथील रहिवाशी भरत प्रभाकर बेलचाटे वय १८ वर्ष हा गावाजवळील कॅनलच्या पाण्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली.यासंदर्भात मृतकाचा मामापु रुषोत्तम सुधाकर सोनटक्के रा.नांदोरा डफरे यांनी देवळी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.मिळालेल्या माहितीनुसार भरत प्रभाकर बेलचाटे हा शेत मजुरीचे काम करीत होता. फिर्यादी मामाच्या घराजवळ श्रीमती वनिता बेलचाटे व त्यांची दोन मुले अविनाश प्रभाकर बेलचाटे व वय २३ वर्ष व भरत प्रभाकर बेलचाटे वय १८ वर्ष या दोन मुलासह राहत होती.दोन्ही मुलं शेतमजुरीचे काम करून आपली उपजीविका भागवीत होते.भरत बेलचाट हा शेती कामाच्या निमित्ताने शेतामधून कॅनल वर गेला असावा व कॅनलच्या पायऱ्या मधून आत उतरत असताना त्याचा पाय घसरून तो कॅनलच्या पाण्यामध्ये पडून त्याच्या मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.देवळी पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतक भरत याचा शव, श्रवविच्छेदनाकरिता वर्धा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे.देवळी पोलीस याप्रकरणी घटनेची नोंद करून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!