घोराड गावात वानरांचा हैदोस;महिला गंभीर जखमी

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ सेलू़ वर्धा:
अलीकडे जंगली प्राण्यांनी शेतशिवाराकडे तसेच गावाकडे आगेकूच करीत धुडगूस घातल्याने अनेक जण त्रस्त झाले आहे गावखेड्यात वानरांचे कळप कोलांटी उड्या मारताना दिसत आहे घोराड गावात या वानराचे कळपाने केवळ गोंधळ घातला नसून चवताळलेल्या वानराने काहिवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना उघडकीस येत आहे मंगळवारी घोराड मंदिर परिसरात या वानराने एका महिलेला लक्ष केल्याने यात ती खाली पडल्याने गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे मंगला धोंगडे असे या जखमी महिलेचे नाव आहे
गेल्या अनेक महिन्यांपासून या वानराचे कळपाने गावात एकच गोंधळ घातला असून अनेकांचे घरावरील टिनपत्रे तथा कवेलूचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे घराचे छतावर काही वाळवण घातले तर हे वानर त्यावर तुटुन पडतात त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास चवताळलेले वानर माणसावर हल्ला करतात यामुळे लोक भयभीत झाले आहे या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने वनविभागाला तसे पत्राद्वारे कळविले पण वनविभागाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे मागे गावातील श्वानाचे हल्ल्यात एक वानर गंभीर जखमी झाले याची सूचना वनविभागाला देताच त्यास तातडीने उपचारासाठी नेले पण गावातील या वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने नागरीकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे गावात वानरांचे कळपाचा हा हैदोस पाहता वनविभागाने तातडीने पावले उचलून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!