जुवाडीच्या उपसरपंचाने डोळ्यात मिरची पावडर टाकून केली मारहाण
क्राईम प्रतिनिधी / वर्धा:
सेलू तालुक्यातील जुवाडी येथे घरगुती कारणातून झालेल्या वादातुन अमर नरड यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी करण्यात आले ही घटना 2 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
अमर पळसराम नरड हा घरी असताना जुवाडी येथील उपसरपंच चापले अरविंद चापले व कांता नरड,प्रीती भांगे,आर्यन भांगे यांनी घरात प्रवेश करून अमर सह त्याची पत्नी पूजा नरड यांच्या घरी आलेल्या आई व बहिणी सोबत घरगुती कारणातून वाद केला व मिरची पावडर डोळ्यामध्ये टाकून लोखंडी रॉडने तसेच काठीने मारहाण करून जखमी केले,या घटनेची तक्रार अमरणे सेलू पोलीसात दिली.पोलीसांनी आरोपी उपसरपंच अरविंद चापले तसेच कांता नरड, प्रीती भांगे, आर्यन भांगे यांच्याविरुद्ध भादवी 324, 323 504 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा सेलू पोलीस शोध घेत आहे .