दुकानासमोर,दुकानदाराचे वाढले अतिक्रमण.

0

दुकानासमोरील उभी वाहने, होणाऱ्या रहदारीला ठरते कारणीभूत.

नगरपालिका प्रशासनाचे होत आहेत दुर्लक्ष.

देवळी : तील व्यवसायिकांनी आपल्या दुकानाचे सामान दुकानासामोरील जागेमध्ये विक्रीकरिता ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.दुकानातील सामान घेण्याकरिता येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवून दुकानात सामान घेण्याकरिता जातात आधीच दुकानदाराने आपल्या दुकानाचे सामान विक्री करिता जास्त रहदारीच्या रस्त्यावर ठेवल्याने जाणारे येणाऱ्यांना त्रास होतो त्यातच दुकानासमोरील ठेवलेली वाहने रहदारी करिता अडथळा निर्माण करीत असल्याचे जागोजागी दिसून येत आहे.यामध्ये ठाकरे चौक ते पोलीस स्टेशन,या रस्त्यावरील दुकाने रस्त्यावर विक्रीचे सामान ठेवत असल्याने सोबतच आपली चार चाकी वाहने व दोन चाकी वाहने उभी राहत असल्याने या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.त्याचप्रमाणे बडोदा बँक,बँक ऑफ इंडिया,महाराष्ट्र बँक,यांच्या समोर सुद्धा मोठी दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागलेली असते.तसेच बाजार चौक, पोस्ट ऑफिस, नगरपरिषद विद्यालय पर्यंत रस्त्याला दुभाजन असल्याने आधीच रस्ता अरुंद आहे व त्यातला त्यातच दुकानदाराचे अतिक्रमण हे वाहतुकीत त्रासदायक ठरत आहे.नगरपालिका या सर्व अतिक्रमणच्या संदर्भात कसलेही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारला भरणारा आठवडी बाजार हा रस्त्यावर दुकाने थाटून मालाची विक्री करणारे दुकानदार नागरिकांना होत असलेल्या त्रासाची कल्पना असून सुद्धा मुजोरीने आपला व्यवसाय थाटत असते.नगरपालिकेकडे व पोलीस प्रशासनाकडे या संदर्भात अनेक तक्रारी देण्यात आल्या पण नगरपालिका प्रशासनाला यासंदर्भात लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पातळीवरील शासकीय प्रशासनाने याची दखल घेऊ वाढते अतिक्रमण व रहदारीला होणारा अडथळा याची दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे. एक विशेष नगरपरिषद ने आठ वर्षांपूर्वी देवळी शहरांमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली होती परंतु या आठ वर्षानंतर च्या कालखंडात देवळी नगर परिषद ने कोणतीच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविलेली नाही हे विशेष आता नगरपरिषद कर्मचाऱ्यांना केव्हा जाग येतो याकडे देवळीकरांचे लक्ष लागलेले आहे.

 

सुमित झोरे साहसिक न्यूज/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!