🔥दैनिक साहसिकचे हिंगणघाट प्रतिनिधी इकबाल भाई पहलवान यांचे निधन.
हिंगणघाट -/ दैनिक साहसिकचे हिंगणघाट प्रतिनिधी इकबाल भाई पहलवान यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह हिंगणघाट शहरातील सामाजिक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
इकबाल भाई पहलवान हे हिंगणघाट परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच नागरिकांच्या प्रश्नांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडत होते. स्थानिक घडामोडींचे वृत्तांकन करताना त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
आज जुहरच्या नमाजीनंतर निशानपुरा कब्रस्तान येथे त्यांच्या पार्थिवावर सुपुर्द-ए-खाक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल (दैनिक सहासिक न्यूज 24 संघटना,)तसेच पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.