दोन दिवसांत दोन पोलिसदादांनी घेतला अखेरचा निरोप, : पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची हळवी संवेदना
नंदकिशोर जाधव
वर्धा :पोलीस दलावर मागील दोन दिवसांपासून दुःखाचा डोंगर ओढवला गेला.दोन दिवसांत दोन पोलीस दादा आपले कर्तव्यदक्षतेचे रक्षण करताना त्यांच्यावर काळाने झडप घेतली.आज वर्धा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस दादांना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना दिली गेली.रवि राघाटाटे हे सेलू पोलीस ठाण्यात जमादार पदावर कार्यरत होते.काही दिवसांपूर्वी ते वैद्यकीय रजेवर होते. कर्तव्यावर रुजू होण्याच्या आधीच त्यांची काल (ता. १९ ला ) प्राणज्योत मावळली.नंदकिशोर जाधव हे हिंगणघाट पोलीस ठाण्यात नायक पदावर कार्यरत होते.ते कर्तव्यावर असतानाच आज (ता.२० ला ) त्यांनी जगाचा निरोप घेतला.”सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश”हे ब्रीद जोपसणाऱ्या पोलीस सेवेत या दोन्ही पोलीसदादांना साहसिक न्युज -24 वर्धा चा सॅल्यूट रवि राघाटाटे
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज – 24