पिलापुर पासून पोरगव्हाण पंचाळा जंगल जडून खाक,या आगीत वनसंपत्ती नेसताना भूत.🔥वनविभागाचे आग विझवण्यात शर्तीचे प्रयत्न ठरले निकामी.
आष्टी शहीद -/ आष्टी तालुका हा जंगल परिसराने मोठ्या प्रमाणात वेळलेला असल्याने वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात असून जंगली जनावरांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. पिलापूर बीटातून लागलेल्या आगीमुळे पोरगव्हाण पंचाळा पर्यंत आग येऊन पोहोचली या आगीमुळे पोरगव्हान, पंचाळा परिसरातील जंगल जळून खाक झाला.
सविस्तर वृत्त असे की पीलापूर परिसर जंगलाला लागलेली आग एवढी भयान होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याकरिता शर्तीचे प्रयत्न केले मात्र लागलेली आग आटोक्यात येणे शक्य नसल्याने केलेले प्रयत्न अखेर फोल ठरले. पिलापूर जंगलात लागलेला आगीचा भडका इतका भयानक होता की ही आग पोरगव्हण, पंचाळा परिसरात येऊन ठेपली या आगीमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. सदर जंगलाला लागलेली आग ही कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लावली असावी . भर भर दुपारी या आगीवर नियंत्रण आणण्याकरिता येथील कर्मचाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले एकीकडे आगीचा तांडव तर दुसरीकडे दिवसान दिवस वाढत असलेले तापमान यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवणे कर्मचाऱ्यांना शक्य झाले नाही अखेर या आगीचा वनवा दूरपर्यंत पोहोचल्याने जंगल परिसरातील झाडे जीवजंतू या आगीमुळे नष्ट नष्ट होऊन वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.