बाभुळगावात ‘खैरलांजी’ची पुनरावृत्ती टळली; दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणारा भाजपचा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा खंडणीबहाद्दर सतिष मानलवार पोलिसांच्या
🔥हाच तो भाजप चा सुपारी किलर जिल्हा सचिव सतीश उर्फ लुच्चा सतीश मानलवार याने दलित पत्रकार ची हत्या करण्याची दिली सुपारी
🔥बाभुळगावात ‘खैरलांजी’ची पुनरावृत्ती टळली; दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणारा भाजपचा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा खंडणीबहाद्दर सतिष मानलवार पोलिसांच्या छत्रछायेत?
यवतमाळ -/ सत्तेची नशा, राजकीय वरदहस्त आणि त्यातून फोफावलेली बेबंद गुंडगिरी यामुळे बाभुळगाव तालुक्यात कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. कृष्णाणपूर येथील एका निरपराध दलित ‘डोफे’ कुटुंबाला संपवण्याचा क्रूर कट रचणारा भाजपचा जिल्हा सचिव नराधम चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असतानाही, तो बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या आवारात राजरोसपणे फिरत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका कार्यकर्त्याच्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यानंतर, पोलीस खात्याची उरलीसुरली अब्रू चव्हाट्यावर आली असून, खाकी वर्दी सतिष मानलवारच्या दावणीला बांधली गेली आहे का, असा थेट सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
बाभुळगाव व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सतिष मानलवार याच्या गुंड टोळीने अक्षरशः दहशत माजवली आहे. राजकीय पदाचा गैरवापर करून शासकीय अधिकारी, कंत्राटदार आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करणे हा या टोळीचा नित्यक्रम झाला होता. मात्र, नुकत्याच घडलेल्या घटनेने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. कृष्णाणपूर येथील डोफे कुटुंबीयांवर चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार आणि त्याच्या गुंडांनी अचानक प्राणघातक हल्ला चढवला. राज्यात कुप्रसिद्ध ठरलेल्या खैरलांजी हत्याकांडाप्रमाणेच या दलित कुटुंबाचा काटा काढण्याचा पूर्ण कट रचला गेला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून आणि डोफे कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतल्याने मोठा अनर्थ टळला; अन्यथा बाभुळगाव तालुक्यात पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला असता. हल्ल्याच्या भीषण धक्क्यातून सावरत डोफे कुटुंबीयांनी बाभुळगाव पोलीस ठाणे गाठून सतिष मानलवार टोळीविरुद्ध तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीअंती पोलिसांनी सतिष मानलवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले. नियमानुसार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ बेड्या ठोकणे पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र, कायद्याची पायमल्ली करत आरोपी सतिष मानलवार स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि ठाण्याच्या आवारात निर्धास्तपणे फिरताना दिसला. ठाणेदार दीपमाला भेंडे आणि प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी आरोपीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, त्याला अक्षरशः ‘संरक्षण’ दिल्याचा संशय निर्माण झाला आहे. आरोपीच्या चेहऱ्यावर ना कायद्याची भीती, ना अटकेची चिंता; उलट ‘आपले कोणीच काही वाकडं करू शकत नाही’ अशा आविर्भावात तो ठाण्याच्या आवारात फेऱ्या मारत होता. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण एका सजग नागरिकाने करून समाजमाध्यमांवर प्रसारित करताच पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणाचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, खुद्द भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच सतिष मानलवार याच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. पक्षाच्या नावाखाली गुंडगिरी, भूमाफियागिरी आणि सर्वसामान्यांचा छळ करणाऱ्या या गावगुंडाचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः पोलीसांनी माहीती दिली. पक्षाची प्रतिमा डागाळणाऱ्या अशा समाजकंटकाला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. “आम्ही पक्षाचे काम जनतेच्या हितासाठी करतो, मात्र मानलवारसारखी प्रवृत्ती सत्तेच्या जोरावर गरिबांचे रक्त शोषत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आरोपी सतिष मानलवार हा केवळ जमिनी हडप करणे रेती चोरट्याना ची वसुली करणे किंवा धमकावणे यापुरताच मर्यादित नव्हता, तर त्याने तालुक्यात खंडणीचे मोठे रॅकेट उभे केले होते. माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा गैरवापर करून तालुक्यातील तहसीलदार, बीडीओ, सार्वजनिक बांधकाम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता. “मंत्र्यांचे खास माणूस” अशी बतावणी करून शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणे हा मानलवारचा गोरखधंदा बनला होता. या त्रासाला कंटाळून तालुक्यातील अनेक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे गोपनीय तक्रारी व कैफियत मांडली होती. तरीही स्थानिक पातळीवर राजकीय दबावापोटी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, आणि त्याचाच परिणाम आजच्या प्राणघातक हल्ल्यात झाला.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी उजळ माथ्याने ठाण्यात वावरत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि बाभुळगावच्या ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या कार्यपद्धतीवर संशयाचे काळे ढग दाटले आहेत. कायदा फक्त हातावर पोट असणाऱ्या गरिबांना आणि सर्वसामान्यांना धाक दाखवण्यासाठीच आहे का? राजकीय वरदहस्त लाभलेल्या गुन्हेगारांपुढे पोलीस दल गुडघे टेकणार का? असे संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. एका दलित कुटुंबाच्या जीविताशी खेळणाऱ्या आणि तालुक्यात दहशत पसरवणाऱ्या सतिष मानलवार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून तात्काळ गजाआड करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिला आहे.(क्रमशः)