🔥हेच ते आदिवाशी विकास मंत्री अशोक उईके आरोपी सतीश उर्फ लुचा मानलवार,याला हमला करण्यासाठी करतात प्रवुर्त,🔥हाच तो भाजपा चा जिल्हा सचिव प्रसिद्ध चमडी चोर सतीश उर्फ लुच्चा मानलवार
🔥भाजपचा जिल्हा सचीव चमडीचोर लुच्छा खंडणीखोर सतीश मानलवार टोळीची पत्रकाराच्या घरावर जीवघेणा हल्ला
🔥घराभोवती ४० हून अधिक जणांचा सशस्त्र जमाव जमवून जातीवाचक शिवीगाळ व अमानुष मारहाण
🔥चमडीचोर लुच्छा खंडणीखोर ‘सतीश मानलवार आमच्या पाठीशी,कोणी वाकडं करू शकत नाही!’ गर्जना करत मानलवार टोळीचा पत्रकार रत्नपाल डोफेंच्या घरावर प्राणघातक हल्ला; महिलांनाही बेदम मारहाण, गाडीची तोडफोड
यवतमाळ -/ ग्रामपंचायतीमधील कोट्यवधींचा अंगणवाडी निधी घोटाळा, बेकायदेशीर वृक्षतोड आणि रेकॉर्ड गहाळ केल्याची प्रकरणे माहिती अधिकारात उघडकीस आणल्याचा संताप मनात ठेवून, स्थानिक भाजपशी संबंधित सतीश मानलवार टोळीच्या गुंडांनी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार रत्नपाल डोफे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला चढवला. तब्बल ४० हून अधिक महिला व पुरुषांच्या जमावाने २२ ऑक्टोबर रोजी रात्री डोफे यांच्या घरावर चाल करत जातीवाचक शिवीगाळ, घरात घुसून धुडगूस, भावाला व भावजयीला बेदम मारहाण आणि वाहनांची नासधूस केली. ‘सतीश भाऊ मानलवार आमच्या पाठीशी आहेत, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही’ अशी उघड धमकी देत आरोपी पसार झाले. या प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात आरोपी चमडीचोर सतीष मानलवार टोळीवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे कलम १८९(२) कलम १९०,कलम १९१(२),कलम ११५(२),कलम ३५२,कलम ३५१(२),कलम ३५१(३),कलम ३२४ गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपी पसार झाले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर चव्हाट्यावर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची गळचेपी करण्याचे अत्यंत संतापजनक व गंभीर कृत्य पंचगव्हाणपूर-झपाटखेडा परिसरात घडले आहे. माहिती अधिकाराचा वापर करून शासकीय यंत्रणेतील गैरकारभाराचा पर्दाफाश करणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रत्नपाल डोफे (वय ४५) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जमावाने पूर्वनियोजित कट रचून जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये डोफे कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या भावाला व भावाच्या पत्नीलाही रस्त्यावर अडवून बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, ‘भाजपचे सतीश भाऊ मानलवार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पोलीस किंवा प्रशासन आमचे काहीही बिघडवू शकत नाही,’ अशी उघड अरेरावी करत गुंडांनी दहशत माजवली. पंचगव्हाणपूर आणि झपाटखेडा गट ग्रामपंचायतीमध्ये सन २०१६ ते २०२४ या कालावधीत अंगणवाडी शासकीय निधीचा झालेला अपहार, परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड तसेच ग्रामपंचायतीचे अधिकृत रेकॉर्ड व प्रभार यादी जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पत्रकार रत्नपाल डोफे यांनी माहिती अधिकारात कायदेशीररीत्या बाहेर काढली होती. यामुळे गावातील भ्रष्ट शासकीय कर्मचारी, माजी पदाधिकारी आणि राजकीय आश्रयाखाली वावरणारे पुढारी उघडे पडले होते. हाच राग मनात धरून राजकीय टोळीने डोफे कुटुंबीयांचा काटा काढण्याचा कट रचला होता. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ ते ९:१५ वाजताच्या सुमारास रत्नपाल डोफे हे पत्नी सुजाता (वय ४०) व मुलगी कल्याणी (वय २२) यांच्यासह घरात असताना, माजी ग्रा.पं. सदस्य प्रमोद यशवंत गेडेकर, अरविंद गेडेकर, दिनेश कामडे, सुरेश जुनघरे, योगेश डाखोरे, सागर ठाकरे, मयुर गेडेकर, सुजल गेडेकर, मोरेश्वर भुजाडे, आनंदराव भोयर, प्रमोद भोयर, रितेश कामडे, सचिन भुजाडे, मनोज भुजाडे, निकेश भुजाडे, नरेश जुनघरे, राजेंद्र कामडे, दिनेश कुरनुले, अतुल चौधरी, प्रफुल चौधरी, समय येंडे, निखिल खेडकर, नंदू वाडगुरे, अंकुश भुजाडे, पुंडलिक खेडकर यांच्यासह निर्मला जुनघरे, मीना गेडेकर, सुवर्णा गेडेकर, संगीता ठाकरे, कल्पना येंडे, मनिषा जुनघरे, माधुरी गुरुनुले, स्वाती गुरुनुले, पूर्णिमा चौधरी, ज्योत्स्ना चौधरी, भारती कामडे, मंगला भोयर, प्रभाबाई गुरुनुले, वंदना देशमुख, कल्पना कामडे, संगीता कामडे, आशा भुजाडे, शांता भोयर, वंदना खेडकर, गुंफा शिवनकर अशा सुमारे ४० ते ४५ महिला व पुरुषांच्या जमावाने डोफे यांच्या घराच्या पोर्चमध्ये अचानक बेकायदेशीर प्रवेश केला.
जमावाने डोफे कुटुंबीयांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन, “निघ रे… तू लय मोठा लीडर झाला काय? तुझ्या बापाची ग्रामपंचायत आहे का? आमचा भ्रष्टाचार बाहेर काढतोस काय?” असे म्हणत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत घरात जोरदार धिंगाणा घातला ,घरात चाललेला हा नंगानाच पाहून भयभीत झालेल्या मुलगी कल्याणी हिने गावामध्येच राहणारे तिचे काका संघपाल डोफे व काकू प्रियंका डोफे यांना मोबाईलवरून संपर्क साधून तातडीने बोलावले. संघपाल व प्रियंका डोफे हे घराकडे धावत येत असताना, जिल्हा परिषद शाळेजवळील हौदाजवळ सागर ठाकरे, सुरेश जुनघरे यांनी संघपाल यांचा हात पकडून मानगूट धरली व त्यांना ओढत जमावामध्ये आणले. त्या ठिकाणी मयूर गेडेकर याने संघपाल यांच्या पोटावर जोरदार लाथ मारली, ज्यामुळे ते खाली कोसळले. खाली पडल्यानंतर रितेश कामडे याने त्यांच्या छातीवर पाय ठेवून तुडवले. त्याच वेळी मोरेश्वर भुजाडे यांनी सुरेश जुनघरे याच्या हातातील दगड पकडल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र रितेश कामडे याने नाल्यातील दगड उचलून घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडी फोडली आणि समोरील डाव्या बाजूचे इंडिकेटर चक्काचूर केले. इतकेच नव्हे, तर मदतीला आलेल्या भावजय प्रियंका डोफे यांना संगीता ठाकरे, मीना गेडेकर, भारती कामडे व मनिषा जुनघरे यांनी रस्त्यात अडवून बेदम थापडा-बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन डोफे यांनी तात्काळ ‘डायल ११२’ वर पोलिसांना पाचारण केले. पोलीस वाहन गावात दाखल होताच जमावाची पळापळ झाली. पळून जात असताना जमावातील आनंदराव महादेव भोयर याने डोफे यांना जाहीर धमकी दिली की, “रत्नपाल डोफे कुठेही गेला तरी आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, कारण आमच्या पाठीशी भाजपचा चमडीचोर लुच्छा खडणीखोर सतीश मानलवार खंबीरपणे उभा आहेत!” रात्री वाहनाची सोय नसल्याने पीडित कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी सकाळी समक्ष बाभूळगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली. भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारावर अशा प्रकारे संघटित टोळीने जातीद्वेषातून प्राणघातक हल्ला केल्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली होती राजकीय वरदहस्त असलेल्या आरोपींवर आज ॲट्रॉसिटीसह दंगल व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.
🔥खैरलांजीची कृष्णापुरात पुर्नाआवृत्ती
राज्यात एका भयानक दुर्घटनेने मन्न सुन्न केले होते त्याच खैरलांजीची पुर्नवृत्ती बाभुळगाव तालुक्यातील एका कुटूबांवर सामुहीक अत्याचार करून मारहाण करून जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न केला या मध्ये अंत्यत निच म्हणुन नावाजलेला भाजपा पदाधिकारी सतिष नारायणराव मानलवार याने हा कट रचला होता मात्र या मध्ये कुटूबांनी जिद्दीने स्वःताचा बचाव करून प्रकरण थेट गृहमंत्र्याकडे नेले होते. आता गुन्हात फरार झालेला लुच्छा आरोपी सतिष मानलवार याला अटक करण्याची तसदी ठाणेदार दिपमाला भेन्डे करतील का याकडे सामाजीक संघटनाचे लक्ष लागले आहे.
आमदार सुधिर मुनगंटीवार तसेच मंत्री अशोक उईकेसाठी खंडणी मागणार्या चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार टोळीच्या बचावासाठी सध्या मंत्री अशोक उईके लुडबुड करीत असुन चमेडीचोर लुच्छा जेल मध्ये जावु नये तसेच पितळ उघडे पडु नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता याच्यावर दबाव आणत असल्याने या प्रकरणात थेट तपासासाठी गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणीस यांनी एसआयटी स्थापन करून संबधीत पिडीताना न्याय द्यावा तसेच पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्याकडुन तपास काढुन उच्च दर्जाच्या आयपीएस अधिकार्याकडुन आरोपी अटक तसेच तपास करण्याचे आदेश द्यावे अन्यथा महाराष्ट्रात या संदर्भात आदोंलन पुकारले जाईल.(क्रमशः)