रसुलाबाद येथे राबविल्या गेला कोलाम समाज बांधवांच्या हितार्थ उपक्रम..
वर्धा – केंद्र सरकारच्या जनमन योजनेअंतर्गत आदिवासी कोलाम लोकांच्या विविध प्रकारच्या योजनांची घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कोलाम पाडे वस्त्या गावांमध्ये कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रा.पं. रसुलाबाद अंतर्गत आदिवासी कोलाम वस्ती कंचनपूर पोड येथे शासनाच्या वतीने जात प्रमाणपत्र , आधीवास प्रमाणपत्र, निराधार योजना, अपंगांच्या योजना, रेशन कार्ड बनविणे, नाव टाकणे , नाव काढणे , मतदान नोंदणी, या योजना राबविण्यात आल्या.
या कॅम्प मध्ये जात प्रमाणपत्र ऑफलाइन करिता 112 केसेस, ऑनलाइन करिता 17 केसेस दाखल करण्यात आल्या. रेशन कार्ड नवीन , नाव वगळणे टाकणे करिता 27 केसेस तर निराधार करिता 13 केसेस दाखल करण्यात आल्या.
यावेळी शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्प मध्ये आर्विचे उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, तहसीलदार आर्वी काळे साहेब, महसूल सहायक आर्वी धीरज सरसार , मंडळ अधिकारी टोळ , तलाठी रसुलाबाद जवंजाळ मॅम, पोलिस पाटील श्याम काकडे रसुलाबाद व कासार बोरी , कोतवाल रसुलाबाद मंगेश चौधरी , ग्रामविकास अधिकारी रसुलाबाद मनभे , ग्रामसेवक हुसेनपूर पराते , मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा रसुलाबाद सोरते सर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंचनपूर मुख्याध्यापक आटोळे सर व ग्रा.पं. क्लार्क सुमित भस्मे यांनी मोलाचे योगदान दिले व प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मदत केली. ग्रामपंचायत कार्यालयात रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर ,उपसरपंच कनेरी मॅम, सदस्य प्रमोद मडावी, दिलीप कनेरी आणि हुसेनपूर च्या सरपंच कनेरी , सदस्य शंकर कासार हे पूर्ण कॅम्प होईपर्यंत उपस्थित होते.
साहसिक न्यूज /24 वर्धा