राष्ट्रीय जनगणेत ओबीसी ची स्वतंत्र नोंद नसल्याने समाजात केंद्राविरोधत असंतोष! श्री संताजी तेली संघटने चे प्रधानमत्र्यांना निवेदन.

0

🔥राष्ट्रीय जनगणेत ओबीसी ची स्वतंत्र नोंद नसल्याने समाजात केंद्राविरोधत असंतोष!

🔥श्री संताजी तेली संघटने चे प्रधानमत्र्यांना निवेदन.

नागपूर -/ वाडी (प्र) देशात संख्येने बहुसंख्यक हिंदू घटक समजल्या जाणाऱ्या ओबीसी समाजाची येणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र नोंदच नसल्याने ओबीसी समाजात तीव्र हा आक्रोश निर्माण झाला असून होणाऱ्या जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र नोंद नोंदवावी अशी मागणी असे संताजी तेली समाज संघटनेने  वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेश चरडे यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साठी एक निवेदन सुपूर्द केले.

      श्री संताजी तेली समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बाजाईत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी श्री अनिल दहाघाणे,श्री रोशन वैद्य,श्री उमेश साहू,श्री सचिन लिचडे,श्री सुरेश बारई, श्री दिपक अवचट,श्री संजय जिवनकर,श्री मोतीराम शहारे,श्री पुरुषोत्तम लाकडे,श्री संजय साहू,श्री संदीप साठवणे,यांनी निवेदन देऊन नगराध्यक्ष नरेश चरडे यांच्याकडे आक्रोश व्यक्त करताना सांगितले की —  भारताच्या २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना व स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याबाबत, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व वस्तुनिष्ठ आकडेवारी अत्यंत आवश्यक असते. आपल्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना सामाजिक न्यायाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.

ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाज हा देशातील मोठा व महत्त्वाचा घटक असूनही आजपर्यंत त्यांची स्वतंत्र व अचूक जनगणना झालेली नाही. परिणामी, त्यांच्या वास्तविक लोकसंख्येची, सामाजिक-आर्थिक स्थितीची व शासकीय योजनांमधील भागीदारीची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही.सध्या जनगणना शीटमध्ये ‘SC, ST, अन्य’ असा एकत्रित उल्लेख असल्याने ओबीसींची स्वतंत्र ओळख व आकडेवारी स्पष्टपणे समोर येत नाही. त्यामु़ळे ओबीसी समाजाच्या हक्कांच्या नियोजनात व अंमलबजावणीत अडथळे निर्माण होतात.

निवेदनाच्या माध्यमातुन मागणी करतो की –

भारत सरकारच्या २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी.

जनगणना फॉर्ममध्ये ‘SC, ST, अन्य’ या कॉलममध्ये आवश्यक सुधारणा करून ‘OBC’ साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा.यामुळे ओबीसी समाजाची अचूक आकडेवारी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीसाठी ठोस धोरणे आखता येतील व खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साध्य होईल.आपण या निवेदनाचा सकारात्मक विचार करून ओबीसी समाजाला न्याय द्याल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे.

         सागर झोरे साहसिक        News-/24 नागपूर,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!