मनविसे अध्यक्ष.अमित राजसाहेब ठाकरे यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून चरखा भेट..

0

🔥मनविसे अध्यक्ष.अमित राजसाहेब ठाकरे यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून चरखा भेट.

सेलु -/ मनविसे अध्यक्ष.अमित राजसाहेब ठाकरे यांनी नागपूर येथे आढावा बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांनी सेवाग्राम आश्रमातील चरख्याची प्रतिकृती भेट म्हणून प्रदान केली. अमित ठाकरे यांनी स्मितहास्य करत या भेटीचा स्वीकार केला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर ,मनसे तालुका अध्यक्ष हरीष भस्मे, मनविसे जिल्हा सचिव पवन धोटे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

पूर्व विदर्भात संघटन विस्तार आणि विद्यार्थी सेनेच्या बळकटीकरणासाठी मनविसे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे यावेळी दिसून आले.

          चैताली गोमासे                    साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!