लाचखोर डॉ. सुकदेव राठोडच्या मनमानी कारभाराने यवतमाळच्या आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा; ‘पंटर’ अमोल जाधवच्या माध्यमातून जिल्ह्यात ‘हप्ता वसुली’चे साम्राज्य!

0

🔥हाच तो जिल्हा शल्य चिकीत्सक सुकदेव राडोठचा वसुली करणारा अमोल जाधव🔥हेच ते डॉक्टर सुखदेव राठोड जिल्हा शल्य चिकित्सक

🔥लाचखोर डॉ. सुकदेव राठोडच्या मनमानी कारभाराने यवतमाळच्या आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा; ‘पंटर’ अमोल जाधवच्या माध्यमातून जिल्ह्यात ‘हप्ता वसुली’चे साम्राज्य!

🔥लाचखोर डॉ. सुकदेव राठोडची जिल्ह्यात ‘दुकानदारी’औषध वाटपात सावळागोंधळ, बेकायदा रुग्णालयांची खैरात

🔥मुख्यमंत्र्यांकडे तक्रार होऊनही पालकमंत्री पाठीशी का घालतात?

​ यवतमाळ -/ ​जिल्ह्यातील सामान्य, गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी थेट खेळ मांडत यवतमाळ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात भ्रष्टाचाराचा उघड नंगानाच सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. लाचखोर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुकदेव राठोड आणि त्याचा खास मर्जीतील ‘पंटर’ अमोल जाधव यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडवला आहे. ‘हम करेसो कायदा’ या थाटात डॉ. राठोड याचा मनमानी कारभार सुरू असून, औषध खरेदीपासून ते थेट खासगी रुग्णालयांच्या परवानग्यांपर्यंत लाखो रुपयांची उकळती वसुली उघडपणे केली जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.

​कार्यालयात सुरू असलेल्या या सावळ्यागोंधळाची पाळेमुळे अतिशय खोलवर पसरली आहेत. पुसद येथून डेपुटेशनवर (प्रतिनियुक्तीवर) खास बोलावून आणलेल्या अमोल जाधव या कर्मचाऱ्याला थेट औषध खरेदी व वाटपाच्या अत्यंत संवेदनशील आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या मोक्याच्या जागी बसवण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवल्या जाणाऱ्या औषधांचे नियंत्रण जाधवकडे सोपवून डॉ. सुकदेव राठोड याने स्वतःची आर्थिक गणिते पक्की केल्याचे दिसते. परिणामी, शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य यामुळे निष्पाप रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. औषधांसारख्या जीवनदायी घटकातही केवळ टक्केवारीच्या हव्यासापोटी चाललेला हा खेळ सर्वसामान्यांच्या जीवावर बेतला आहे.

​डॉ. सुकदेव राठोड आणि अमोल जाधव यांच्या अभद्र युतीने यवतमाळ जिल्ह्यात नियम, अटी व शर्ती पायदळी तुडवून वाटेल त्याला पैसे घेऊन खासगी रुग्णालये सुरू करण्याच्या परवानग्या वाटल्या आहेत. कोणतीही वैद्यकीय मानके, अग्निशमन सुरक्षा किंवा तज्ज्ञ मनुष्यबळ नसताना केवळ पैशांच्या जोरावर ही ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ दुकाने थाटण्यात आली आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या रुग्णालयांना अशा बेकायदा परवानग्या दिल्या आहेत, त्यांच्याकडून दरमहा नियमित ‘हप्ता वसुली’ करण्याचे काम अमोल जाधव अत्यंत चोखपणे पार पाडत असल्याची चर्चा आरोग्य वर्तुळात रंगली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने शासकीय सेवेचे रूपांतर चक्क ‘हप्ता वसुली केंद्रात’ करून टाकल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

​कार्यालयातील प्रशासकीय शिस्त पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आली आहे. जबाबदार शासकीय अधिकारी व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचे अधिकार डॉ. राठोड याने एका नवख्या आणि अननुभवी लिपिकाच्या हाती सोपवून ठेवले आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा वचक संपला असून संपूर्ण कार्यालय भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतले आहे. जे कर्मचारी या बेकायदेशीर कारभाराला विरोध करतात, त्यांना डावलले जाते, तर लाचखोरीच्या साखळीत सामील असलेल्यांना मोक्याची पदे देऊन मलिदा लाटण्याची खुली सूट दिली जात आहे.

​जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुकदेव राठोड याच्या लाचखोरीची आणि आर्थिक गैरव्यवहारांची सविस्तर तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी दाखल करण्यात आली आहे. मात्र, इतके गंभीर आरोप आणि उघड पुरावे समोर असतानाही अद्याप राठोडवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यावरून, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे या लाचखोर शल्यचिकित्सकाला पाठीशी का घालत आहेत, असा संतप्त सवाल यवतमाळची जनता आणि सामाजिक संघटना विचारत आहेत. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतका मोठा गैरव्यवहार वर्षानुवर्षे उघडपणे सुरू राहूच शकत नाही, असा ठाम संशय आता बळावला आहे. ​या सर्व गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी व अचानक तपासणी केली होती. या पाहणीदरम्यान कार्यालयाच्या कामकाजात अनेक गंभीर त्रुटी, विसंगती आणि अक्षम्य बेजबाबदारपणा उघडकीस आला होता. मात्र, ज्यांच्या नियंत्रणाखाली हा संपूर्ण गैरकारभार चालतो, त्या मुख्य सूत्रधार डॉ. सुकदेव राठोड आणि अमोल जाधववर थेट कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ एका सामान्य कंत्राटी लिपिकावर थातुरमातूर कारवाई करून सोपस्कार पूर्ण केले.

​या प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांची ती पाहणी केवळ दिखावा आणि ‘भेट’ घेण्यापुरतीच होती का, असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे. छोट्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून मुख्य लाचखोर अधिकाऱ्यांना अभय देण्याचे हे धोरण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच संशय निर्माण करणारे ठरले आहे.

​यवतमाळ जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था आयसीयूमध्ये पोहोचवणाऱ्या डॉ. सुकदेव राठोड आणि त्याच्या संपूर्ण टोळीची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ दिखाऊ नोटिसा न बजावता डॉ. सुकदेव राठोड याचे तात्काळ निलंबन करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करावी आणि बेकायदा रुग्णालयांना परवानग्या देणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा यवतमाळकर रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा आता दिला जात आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!