शिरपूर होरे येथे स्वामी विवेकानंद,माता जिजाऊ जयंती साजरी.
देवळी : तालुक्यातील स्थानिक जय विकास महाविद्यालय शिरपूर होरे येथे राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ.मनोज ढोणे हे होते तर मंचावर प्रा.डाॅ.अमित दारूंडे प्रा.राजुरकर प्रा.भांदकर,प्रा.प्रिया बर्धिया प्रा.मंगेश भगत प्रा.गजानन लोखंडे हे होते कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यापऀण करुन करण्यात आली यावेळी प्रा.डाॅ.मनोज ढोणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आजच्या युवकांना जर प्रगती करायची असेल तर या महान विभूती चे आदर्श समोर ठेवले पाहिजे युवक कसा असावा हे सांगताना ते म्हणाले की ज्याचे हात हरकामी ज्याची बुद्धी सर्वगामी व ज्याचे हदय सर्वप्रेमी तो खरा युवक ही धारणा मनाशी बाळगून आपण मार्गक्रमण केले पाहीजे यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश धरत यांनी केले तर आभार प्रशांत माने यांनी मानले कार्यक्रमाची सांगता विद्यापीठ गीताने करण्यात आली.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी