संघपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न…

0

🔥संघपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न.

आजनसरा,-/ भीमा कोरेगाव शौर्य दिन तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त संघपाल महाराज पवनुरकर सत्यपाल महाराजांचे शिष्य यांचा कार्यक्रम हिवरा आजनसरा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने झाली कार्यक्रमांमध्ये संत महापुरुषांच्या विचाराच्या महती सोबतच स्त्रीभ्रूणहत्या ग्राम स्वच्छता व्यसनमुक्ती तरुण जागृती इतर विविध विषयांसोबतच संघपाल महाराज यांनी आपल्या सप्त खंजिरीच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले आपल्या वाणीतून महापुरुषांचे विचार त्यांनी मांडला कार्यक्रमाचे आयोजन सचित बुद्ध विहार तथा रमाई महिला मंडळ यांनी आयोजित केला होता सदर कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपाशी का गुरुदेव उपासक तथा गावातील नागरिक आणि परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि राष्ट्रवंदने कार्यक्रमाची सांगता झाली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 हिंगणघाट, वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!