सलाईन’वर जिल्हा रुग्णालय; शल्यचिकित्सक डाॅ.सुखदेव राडोठ ढिम्म कारभारामुळे गरिबांचे आरोग्य वाऱ्यावर

0

🔥 हाच तो या भ्रष्ट डाॅ सुखदेव राठोड कडे जिल्हाधिकारी लक्ष घालतील का?

🔥सलाईन’वर जिल्हा रुग्णालय; शल्यचिकित्सक डाॅ.सुखदेव राडोठ ढिम्म कारभारामुळे गरिबांचे आरोग्य वाऱ्यावर

🔥आर्थिक गैरव्यवहार, औषध खरेदी घोटाळा  

🔥जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ‘अर्थकारणा’ने सरकारी आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर!

🔥डॉक्टर-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि रुग्णांच्या हेळसांडीवर थेट वार

🔥रुग्ण दारात, डॉक्टर खासगी क्लिनिकमध्ये; जिल्हा शल्यचिकित्सकांचे ‘अर्थपूर्ण’ मौन

यवतमाळ प्रतिनीधी -/ ​शासकीय तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा निधी ओतूनही सर्वसामान्यांचा आधार ठरायला हवे असलेले जिल्हा रुग्णालय आता मृत्यूचा सापळा बनू पाहत असून, या गंभीर दुरवस्थेकडे जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचे उघड झाले आहे. औषधांचा तुटवडा, बंद पडलेली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी या चक्रव्यूहात अडकलेल्या रुग्णांची दररोज दैना उडत असताना, जिल्ह्याचे आरोग्यप्रमुख मात्र आपल्या वातानुकूलित दालनातून कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहेत. खासगी रुग्णालयांच्या उंबऱ्यांवर गरिबांचे होणारे आर्थिक शोषण रोखण्यात आलेले अपयश जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर त्यांच्या हेतूवरही गंभीर संशय निर्माण करत आहे. ​गोरगरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार देण्याच्या सरकारी दाव्यांची जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयातच राजरोसपणे विल्हेवाट लावली जात असल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. आवश्यक औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण करून विशिष्ट मेडिकल आणि खासगी पॅथॉलॉजी लॅबचे उखळ पांढरे करण्याची सिंडिकेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आशीर्वादानेच फोफावली आहे. रुग्णांचे प्राण टांगणीला लागलेले असताना खरेदी निविदांमधील टक्केवारी आणि बदल्यांच्या ‘अर्थकारणा’त गुंग असलेल्या प्रशासनामुळे रुग्णालयाची अवस्था एखाद्या कत्तलखान्यासारखी झाली असून, या बेपर्वाईविरोधात आता जनतेतून तीव्र संताप उसळत आहे. ​अपघात, प्रसूती आणि गंभीर आजारांनी तळमळणाऱ्या रुग्णांना उपचारांऐवजी केवळ ‘रेफर टू हायर सेंटर’चा शिक्का मारून जबाबदारी झटकणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे रसातळाला गेला आहे. शासकीय पगारावर डल्ला मारून स्वतःची खासगी प्रॅक्टिस चालवणाऱ्या कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवण्याऐवजी जिल्हा शल्यचिकित्सक अशा बेजबाबदार यंत्रणेचे पाठीराखे बनले आहेत. औषधोपचारांअभावी रुग्णांचे बळी जात असताना केवळ कागदोपत्री चौकशीचे सोपस्कार पार पाडणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सामान्य जनतेच्या जिवाचे काही देणेघेणे उरले आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील आकाश जाधव या कर्मचार्याकडुन कथीत वसुलीमुळे अनेक खासगी डाॅक्टरांनी उपसंचालकाकडे तक्रारी दिल्या मात्र या तक्रारी डाॅ . सुकदेव राडोठ यांनी दडपल्या आहे. जिल्हाधिकारी विकास मिना यांनी जिल्हा शल्यचिकत्सक कार्यालयाची पाहणी करीत असताना त्यांना एका लिपीकाने देयके रोखुन धरल्याची बाब समोर आली होती त्यामुळे त्याचे निलंबन सुद्धा केले मात्र कथीत वसुलीबाज आकाश जाधव तसेच जिल्हा शल्यचिकत्सकावर मात्र कारवाई न झाल्याने विविध चर्चेला उधान आले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

​

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!