सहकारी बँकेला सक्षमी करण्यासाठी पतसंस्था चे प्रयत्न.
देवळी : तालुक्यातील वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देवळी शाखेच्या सक्षमी करण्यासाठी सहकारी पतसंस्थानी एकत्रित येऊन बँकेमध्ये नवीन ठेवी ठेवण्याकरिता ग्राहकांना विश्वासात घेऊन बँकेच्या कामकाजाविषयी व विश्वास दर्शविण्याकरिता प्रयत्न व्हावे त्या करिता देवळी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये सहाय्यक निबंधक मनीषा मस्के यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली सभेला सहाय्यक अधिकारी सतीश जासूतकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित अधिकाऱ्याने नवीन ठेवी बँकेला द्यावा व बँकेचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करावे सांगण्यात आले.यावेळी प्रास्ताविक भाषणातून उपरोक्त बँकेची तथा आणि व्यथा व्यक्त करीत परत या बँकेचा सक्षमी ठेवीदाराने बँकेत फिक्स डिपॉझिट करण्याचे आव्हान करण्यात आले.शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली ही बँक आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुनश्च उभी करून असा विश्वास संजय कोरडे यांनी यावेळी व्यक्त केले.ही बँक शेतकऱ्याची आहे म्हणून ही बँक अधिक बळकट होण्यासाठी तसेच पुढे जाऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्हावा म्हणून या बँकेला सक्षम करण्याचे गरजेचे आहे असे मत सहाय्यक निबंधक मनीषा मस्के यांनी व्यक्त केले. यावेळी १५ पतसंस्थेचे अध्यक्ष व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेमध्ये पुलगाव अर्बन सोसायटी, ग्रामीण माध्यमिक पतसंस्था,साई श्रद्धा या पतसंस्थाच्या प्रतिनिधींनी आपापले मत यावेळी व्यक्त केले.शाखा व्यवस्थापक रामटेके यांनी देवळी शाखेच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली यावेळी सह सहकारी अधिकारी यांनी ५० हजार रुपये मुदत ठेवीचा धनादेश संजय कोरडे यांच्या स्वादिने केला येत्या मासिक सभेत ठराव घेऊन बँकेला नवीन ठेव देण्याचे मान्य केले संचालन शाखा व्यवस्थापक रामटेके यांनी केले.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी