साहूर येथील अंगणवाडीत खराब धान्यांच्या आहाराचा पुरवठा लाभार्थ्यांचा आहार नेण्यास नकार…..

0

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहूर गावातील अंगणवाडीत अतिशय निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत हे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ते नेण्यास लाभार्थ्यांनी साफ नकार दिलेला आहे या धान्यामुळे आरोग्य धोक्यात येत असून हा पुरवठा अतिशय निंदनीय आहे लहान मुलांना आहार मिळावा याकरता शासनाच्या वतीने अनेक धान्याचे पॉकेट दिल्या जातात परंतु या पॉकेट मधील धान्य हे खराब असून लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे आहे त्यामुळे पालकांनी ते धान्य नेण्यास साफ नकार दिलेला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता लाभार्थी करीत आहे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भ्रष्टाचारी ठेकेदारांवर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे हे विशेष

शरद वरकड साहसिक न्यूज -/24 साहूर, आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!