६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन वर्ध्यात मोठ्या उत्साहात साजरा
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वर्धा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बौद्ध अनुयायांनी हार अर्पण करून अभिवादन केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे . बौद्ध धर्मिया द्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजय दशमीच्या दिवशी दीक्षाभूमी नागपूर येथे साजरा करतात. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी या दिवशी नागपूरला येतात, या उत्सवाची पार्श्वभूमी म्हणजे हा एक धर्मांतर सोहळा आहे. विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा 5 ऑक्टोबरला नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 66 वा धम्मचक्र दिन साजरा होत आहे… जे बौद्ध अनुयायी नागपूर येथे दीक्षाभूमी वरती जाऊ शकत नाही ते लोक वर्धा येथील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करतात तसेच पुतळ्याच्या भोवताल मेणबत्ती जाळून त्यांना अभिवादन सुद्धा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायी तसेच उपाशी का लहान मुले यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे..