🔥हाच तो डॉ.सचिन तडस कोविड काळातील मनमर्जी,अवैध गर्भपात,शासकीय औषधांची अफरातफरमुळे राहिले बहुचर्चीत.
वर्धा -/कोविड संकट काळात मनमर्जीचा सपाटा,शासकीय औषधांची अफरातफर,अवैध गर्भपात प्रकरण आदीमुळे बहुचर्चीत राहिलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस यांची नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथील स्त्री रुग्णालयातील रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
तसेच कोविड संकट काळात मनमार्जीचा सपाटा लावणे,कोविड साथरोगावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकींना अनुपस्थित राहणे, ईसीआरपी मधील निधीचे नियोजन न करणे,निधी वेळोवेळी शासनास जमा न करणे व सन्माननिय लोकप्रतिनिधी व जिल्हाधिका-यांच्या आदेशांची अवमानना करणे यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याने संबंधित गंभीर आरोपांचा ठपका ठेवून २१ मार्च २०२२ ला तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठांना जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. सचिन तडस यांच्यावर चौकशी करीत कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार केली होती.तर आर्वीच्या अवैध गर्भपात प्रकरणी गठीत सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने डॉ. सचिन तडस यांच्या कार्यप्रणालीवर विविध गंभीर आरोपांचा ठपका ठेवून आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.शिवाय याच अहवालात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावनी न करणे तसेच शासकीय औषधांच्या अफरातफरीचा ठपका ठेवण्यात आला आहे.अशा या विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस यांची नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथील स्त्री रुग्णालयातील रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून अखेर बदली करण्यात आली आहे.हा बदली आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी ३१ ऑगस्टला निर्गमित केला आहे. संबंधित बदली आदेशातील सूचनांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्य विभागाच्या नागपूर मंडळाच्या उपसंचालकांनी नंदूरबार जिल्ह्यात रुजू होण्यासाठी डॉ. सचिन तडस यांना १० सप्टेंबरला पत्र निर्गमित करून कार्यमुक्त केले आहे.