‘अग्निपथ’ रद्द करा; भीम टायगर सेनेचे वर्ध्यात आंदोलन
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
भारतीय सैन्य भरतीबाबत केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ ही योजना जाहीर केली आहे. मात्र, या विरोधात अनेक राज्यातील तरुणांनी तसेच भावी सैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. देशभरात या योजनेचा निषेध होत असताना वर्धेतही याचे पडसाद बघायला मिळाले. आज सोमवार २० रोजी भीम टायगर सेनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अतूल दिवे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके यांच्या नेतृत्त्वात स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या निर्णयाचा निषेध करीत अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
केंद्र सरकारने १४ रोजी अग्निपथ योजना अंमलात आणली. सदर योजना भारतीय संविधानाची पायमल्ली करणारी व विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. या योजनेंतर्गत भारतीय सैन्याचा तीनही दलामध्ये सैनिकांची भरती ही फक्त चार वर्षाकरीता करण्यात येणार असे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. सैन्यदलात जाण्याची तयारी करणार्या सर्व विद्यार्थ्याचा या योजेनेस विरोध आहे. चार वर्षात एक परिपक्व सैनिक तयार होणे शक्य नाही. चार वर्षामध्ये तयार होणारा सैनिक हा कोणत्याही वातावरणाशी किंवा आकस्मिक येणार्या परिस्थितीशी झुंज देण्यास पूर्णरित्या तयार होऊ शकत नाही. संपूर्ण विद्यार्थी आपले आयुष्य देशसेवेसाठी देण्याच्या मानसिकतेने सैन्यात दाखल होतात. मात्र, या निर्णयामुळे त्या विद्यार्थ्यांची मानसिकता खच्चीकरणाचे काम होत आहे . त्यामुळे ही योजना रद्द करावी व पूर्वीची योजना जशीच्या तशी परत पुर्वरत करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात भीम टायगर सेनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अतुल दिवे, भीम टायगर सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, उप जिल्हाध्यक्ष विशाल नगराळे, जिल्हा संघटक आशिष जांभुळकर, पंकज लभाने, विकास झंझाळ, अंकुश मुजेवार, प्रज्वल डंभारे, आदर्श सांगोले, सौरभ हातोले, सागर वैद्य, गणेश ताकसांडे, कुणाल सहारे ,विक्रम थूल, गजानन भगत , ज्ञानेश्वर रामटेके, राजेश सेजुळकर, अमोल खोब्रागडे , स्वप्नील गोटे , सुमित गजभिये, अमित गजभिये, संकेत हनुमंतेष विक्की पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.