वर्धा – अल्लीपुर /च्या धोत्रा चौरस्ता नजिकच्या गणेश पेट्रोल पंप जवळ आज दुपारी अपघात झाला त्यात एक इसम जागिच ठार झाला.तसेच पेट्रोल पंप वरून दुचाकी मोपेड गाडी क्रमांक एम .एच . 32 ए . डब्ल्यू 34 36 ही गाडी पेट्रोल पंप वरून पेट्रोल भरून धोत्रा रोड वर येत असताना हिंगणघाट कडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने मागुन येऊन मोपेड गाडीला धडक दिली त्यामध्ये मागे बसून असलेला वीलास सुदाम आंबकर वय 55 वर्ष जागीच ठार झाला हिंगणघाट वरून तळेगाव टालाटूले ला मुपेड या गाडीने चालक प्रफूल बुचे वय 25 वर्ष व मृतक विलास सुदाम आंबटकर वय 55 वर्ष राहणार तळेगाव (टा.) धोत्रा हिंगणघाट हायवे रोडने जात असताना धोत्रा जवळील गणेश पेट्रोल पंप च्या मागून अज्ञात ट्रक ने मागून दुचाकी मोपेड गाडीला धडक दिली त्यामध्ये एक ठार झाला व एक गंभीर जखमी आहे.अल्लीपूर येथील पोलीस स्टेशनचे जमादार विनोद बुरले पोलीस शिपाई योगेश चंदनखेडे किशोर घुगे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गंभीर जखमी युवकाचा उपचार सेवाग्राम रुग्णालयात सुरू आहे.तसेच ज्या ट्रकने अपघात झाला तो ट्रक घटनास्थळावरून काही क्षणातच पसार झाला होता.पुढील तपास अल्लिपुर पोलिस अज्ञात ट्रक व चालकाचा शोध घेत आहेत.