अपंग शेतकर्याची पीएम किसान सन्मान निधीसाठी फरफट.
आष्टी शहीद येथील प्रशासनाकडे जाऊ, जाऊ,हेच ते अपंग कंटाळलेले शेतकरी गणपत महादेव गायकी
आष्टी शहीद : स्थानिक मौजा लहान आर्वी येथील अपंग शेतकरी गणपत महादेव गायकी यांच्या कडे शेत सर्वे नंबर १७४ प्रमाणे शेती आहे. सदर शेतीच्या माध्यमातुन अपंग शेतकर्याला पी. एम. कीसानचे ५ हप्ते मिळाले. परंतु ६ व्या हप्त्या पासुन अपंग शेतकरी गणपती महादेव गायकी प्रशासनाकडे जाऊ जाऊ कंटाळल्याने फरफट झाली आहे. अपंग शेतकरी गणपत महादेव गायकी हे तहसील कार्यालयात गेले असता त्यांना क्रुषी विभागात जाऊन पी.एम.कीसान टेबलवर चौकशी करण्याचे सांगितले. अपंग शेतकरी क्रुषी विभागात गेल्यावर तेथील रुपाली नामक कंत्राटी कर्मचारी महिलेने त्यांना बॅंकेत जाऊन आधार लिंक करण्याचे सांगितले.त्या़ महिलेच्या सांगितले प्रमाणे अपंग शेतकरी अंतोरा येथील बॅक आॅफ इंडीया मध्ये गेले तर त्यांचे आधार बॅक खात्याला लिंक असल्याचे सांगितले. परत अपंग शेतकरी क्रुषी विभागात गेले आणि आधार बॅक लिंक असल्याचा पुरावा दाखवला तर त्या शेतकर्याला पैसे का बरं येत नाही हेच आम्हाला कळत नाही.अशा पध्दतीने क्रुषी विभागाने लहान आर्वी येथील अपंग शेतकर्याची फरफट केली आहे. या सर्व गोष्टींवरून शेतकर्यांच्या पी. एम. कीसान योजनेकडे क्रुषी विभागाचा आणि महसुल विभागाचा समन्वय नसल्याचे दिसून येतो.प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई मुळे शेतकर्यांवर अशा पध्दतीची पाळी आल्याने पी. एम. कीसान योजनेचे आष्टी तालुक्यात तीन तेरा वाजले असे म्हणायला हरकत नाही.
नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद