आमदार राजु तोडसामच्या खंडणीवसुलीमुळे आर्णी मतदार संघाचा विकास खोळबंला 

0

🔥हेच ते अर्नी विधानसभे चे भाजपा पक्षाचे आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी पाच कोटी ची खंडणी दिली नाही म्हणून आपले भावा चे जेसीपी ने खोदला रस्ता

🔥आमदार राजु तोडसामच्या खंडणीवसुलीमुळे आर्णी मतदार संघाचा विकास खोळबंला 

🔥५० कोटींच्या रस्ते कामात अडथळा आणि टक्केवारीच्या मागणीचे गंभीर आरोप; आमदार राजू तोडसाम यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

​यवतमाळ -/ आर्णी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर टक्केवारीची मागणी आणि कंत्राटदारांची अडवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्थानिक आमदार राजू तोडसाम यांच्याकडून विकासकामे करणाऱ्या कंपन्यांकडे थेट वाटा मागितला जात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. रस्त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ते खोदून ठेवल्याने अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याचा दावाही केला जात आहे. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू असताना, दुसरीकडे विकासकामांमधील या कथित वसुली धोरणामुळे मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे.

आर्णी विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ते आणि इतर विकासकामांमध्ये सत्ताधारी आमदारांकडून हस्तक्षेप आणि टक्केवारीची मागणी होत असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. आमदार राजू तोडसाम यांनी मतदारसंघातील विकासाऐवजी स्वार्थापोटी कंत्राटदारांची कोंडी केली असल्याचा दावा विरोधक आणि स्थानिक स्तरावरून केला जात आहे. या आरोपांमुळे मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​स्थानिक पातळीवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरून आमदार तोडसाम यांनी सध्या सुरू असलेल्या विकासकामांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाटा मिळवण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मतदारसंघात सध्या ‘औदार्य कन्स्ट्रक्शन’ कंपनीमार्फत दोन कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. या कामातही आमदारांनी थेट ५० टक्के वाटा ठेवण्याचे फर्मान सोडल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. ​याशिवाय, आर्णी (८०) विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून ‘मॅक पॅरामाऊंट’ या कंपनीला सुमारे ५० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून त्यात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप आहे. हे काम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आमदारांकडून थेट पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास काम बंद पाडण्याचा इशारा दिल्याचे बोलले जात आहे. या कथित दबावतंत्रामुळे मतदारसंघातील अनेक लहान-मोठे कंत्राटदार वेठीस धरले गेले असून विकासकामांची गती मंदावली आहे.

​या वादाचे सर्वात गंभीर पडसाद सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर उमटल्याचे दिसून येत आहे. रस्ते बांधकामात अडथळा आणण्यासाठी आमदारांच्या भावाच्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनेक मार्गांवर खोल खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या खोदलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हरेंद्र लक्ष्मण मडावी आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, स्वतःच्याच समाजातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

​यवतमाळ जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, हाताला काम नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करत आहेत. अशा कठीण काळात मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे स्थानिकांना रोजगार मिळणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदारांकडून होणाऱ्या कथित वसुली धोरणामुळे कामे ठप्प पडत असून, स्थानिकांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याची टीका होत आहे. ज्या मतदारांनी विश्वासाने निवडून दिले, त्यांच्याच हिताला बाधा पोहोचवणारे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

​या सर्व गंभीर आरोपांबाबत संबंधित कंत्राटदार कंपन्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच, आमदार राजू तोडसाम यांच्याकडूनही या आरोपांवर कोणतेही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. प्रशासनाने आणि बांधकाम विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून रस्ते खोदणाऱ्यांवर कारवाई करावी आणि रखडलेली विकासकामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!