आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल भोई समाज क्रांती दलाकडून सत्कार….

0

🔥शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन केला सत्कार.

सिंदी (रेल्वे) -/ हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावर यांना भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते मुंबई येथे उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याप्रीत्यर्थ भोई समाज क्रांती दल यांच्या वतीने आमदार समीर कुणावार यांचा त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी २३-२४ चा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे विदर्भातील सदर पुरस्कार प्राप्त होणारे ते एकमेव आमदार आहेत. तसेच वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात उत्कृष्ट संसदपटू चा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच आमदार आहे. आमदार कुणावर यांची २३-२४ मध्ये विधानसभागृहात ९० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती होती. हे उल्लेखनीय. त्यांनी विविध प्रश्नावर आपल्या भूमिकांचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात तालिका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुकही केले होते. तसेच त्यांनी सभागृहात मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्याच प्रमाणे हिंगणघाट येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे का गरजेचे आहे संदर्भात मांडलेल्या भूमिकांची शासनाने गांभीर्याने दखल घेतली होती. सत्तेत असून सुद्धा त्यांनी जनतेच्या विविध समस्यांवर पारखडपणे आपली भूमिका मांडून शासनाचे लक्ष वेधले. या सर्व कामगिरीचे मूल्यांकन होऊन त्यांना २३-२४ चा उत्कृष्ट संसद पटूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. आमदार समीर कुणावार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भोई समाज क्रांती दलाकडून कुणावार यांचा त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाज बांधव भोई समाज क्रांती दल विभागीय अध्यक्ष पंकज बावणे, प्रशांत कोल्हे, विनोद दाते, छत्रपती भोयर, मनोहर भोयर, गजानन इसनकर, विनोद कांबळे, सारु मेश्राम व असंख्य भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनेश घोडमारे साहसिक news -24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!