आमदार समीर कुणावार यांनी केला समुद्रपूरच्या पुरग्रस्तांना किराणा किट वाटप

0

Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ गजेंद्र डोंगरे :
दिनांक १७ व १८ जुलैला समुद्रपूर शहरात आलेल्या महापुरामध्ये अनेक कुटुंबियांना प्रचंड त्रास सोसावा लागला धन,धान्य पासून तर घरातील प्रत्येक वस्तू ही पाण्याखाली होती तेव्हा आमदार कुणावार याची दखल यांनी तलाठ्यांच्य माध्यमातून प्रत्येकांच्या घरी जाऊन नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्त कुटुंबांना सर्व्हे केला शासनामार्फत एकुण परिस्थिती बघता आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पुरग्रस्त कुटुंबाला मदत करण्याचा संकल्प केला होता व त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करून महामंत्री किशोर दिघे तालुका अध्यक्ष संजय डेहणे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत ,विकी बारेकर सह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नियोजनबद्ध पद्धतीने दीपाली मंगल कार्यलयात येथे आजच्या किराणा किट वितरण कार्यक्रचे नियोजन केले व आज जवळपास 215 पुरग्रस्ताना दोन महीने पुरेल इतके किराणा कीट चे वाटप करण्यात आले.. यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे,जिप वर्धा चे माजी अध्यक्ष नितीन मडावी तालुका अध्यक्ष संजय डेहणे,पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश फुसे, युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,‍ नगरसेवक प्रा मेघश्याम ढाकरे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत,तालुका महामंत्री वामन चदनखेडे,माजी नगराध्यक्ष शीला सोनारे, माजी उपाध्यक्ष वर्षाताई बाभूळकर , महिला आघाडीच्या समीक्षा मांडवकर , नगरसेविका आरती कुडे,मोनिका काळे सिमा काळे,वनिता झाडे माजी नगरसेविका तारा अडवे, इंदू झाडे, सुषमा चिताडे, वनिता कांबळे,आशिष अंन्डरस्कर,शहर अध्यक्ष राम काळे युवा मोर्चा चे विकी बारेकर , रजत भुरे,अनुराग चौधरी, अतुल बावणे,बालु इंगोले,संजय वरटकर, शेषराव तुळणकर मडकाम आदी मान्यवर उपस्थित होते
संचालन गजानन राउत यांनी केले तर प्रास्तविक प्रा मेघश्याम ढाकरे यांनी केले तर आभार संजय डेहने यांनी मानले आदी पदाधिकारी व मंगेश राऊत, मुकेश गोठे,नरेश आरसे वृषभ झाडे,नितीन मोरे, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!