तुळजापूर वघाळा -/क्रांतीवीर स्व महादेवराव ठाकरे सोशल असोसिएशन वर्धा द्वारा संचालित इंदिरा गांधी व्यसनमुक्ती केंद्र वर्धा येथे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये शिरस्मुद्र, झडशी, टाकळी, रिधोरा, बोपापूर् ग्रामपंचायत ला भेट देऊन व्यसनाचे परिनामाबाबत माहिती दिली.२६ जून२०२४ ला इंदिरा गांधी व्यसनमुक्ती केंद्र वर्धा येथे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी सप्ताह समारोप कायर्क्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदेव काळे महाराज तर अध्यक्ष स्थानी संस्थेच्या साचिवा शैलेजा ठाकरे उपस्थित होत्या. प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून पूजन करण्यात आले.काळे महाराज यांनी आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्त व्यसनाकडे तरुण युवक युवती वळले असून व्यसनामुळे होणारे वाईट परिणाम असून त्यामुळे कुटुंब उ्ध्वस्त होतात याप्रसंगी केंद्राचे प्रकल्प संचालक रमेश मोहदुरे , डॉक्टर जयंत गांडो ले, तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक सबाणे, गजानन जाधव, सुनिल पेंदंम, राजू मुळे, तसेच कार्यक्रमाचे संचालन सारिका देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेश्मा बोभाते यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल पुंड, अनिल उईक, जगदीश कूम्रे, किरण देशमुख, सचिन हिवरे, सुरेश मसराम, अक्षय भुयारकर, सुवर्णा बायसकर, महेंद्र पधरे, सीमा सोनटक्के. उपस्थित होते रुग्णांनी आपापले मनोगत व्यक्त केले. नंतर आंतर्राष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली