उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेचा आ. कुणावार यांनी घेतला आढावा….

0

🔥उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेचा आ. कुणावार यांनी घेतला आढावा….

🔥अव्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या,कर्मचारी,अधिकाऱ्यांवर कारवाई करणार,आ.कुणावार.

हिंगणघाट -/ गेल्या शुक्रवारी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात महिला व नवजात अर्भकांच्या आंतररुग्ण कक्षात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक संतप्त झाले,यावेळी काही नागरिकांनी सदर प्रकार जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला होता.
या व्यवस्थेच्या अनुषंगाने आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी आरोग्य विभागाच्या तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करीत एका बैठकीचे आयोजन केले, यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुमंत वाघ, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार योगेश शिंदे,महावितरणचे कार्यकारी अभियंता पि.आर घुरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत धमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल नायक, ठाणेदार देवेंद्र ठाकूर,डॉ.लांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.कुणावार यांनी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हजेरीत नागरिकांच्या तसेच पत्रकारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्यांनी झालेल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
आज बैठकीच्या निमित्ताने अनेक समाजसेवक व मान्यवर नागरिकांनी हजेरी लावली, यावेळी संतप्त होऊन नागरिकांनी तसेच पत्रकारांनी आपला आरोग्य प्रशासनावरती तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती वीज पुरवठा खंडित का झाला असा सवाल करीत रोष व्यक्त केला.
आजच्या बैठकीत संतप्त नागरिकांनी तसेच पत्रकारांनी रुग्णालयातील अव्यवस्थेचा पाढाच वाचला,शुक्रवारी विजपुरवठा खंडित झाल्यानंतर येथील नवजात बाळांना व मातांना मोठा त्रास सहन करावा लागला, रुग्णालयात आ. कुणावर यांनी प्रयत्न करून कोविड काळात मोठे जनरेटर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, परंतु असे जनरेटर अद्यापही सुरू करण्यात आले नव्हते, येथील काही शौचालय कुलूप बंद स्थितीत होते तर इतर शौचालयात मुंग्या माकोड्याचा प्रकोप होता, येथील परिसरात अनावश्यक झाडेझूडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, औषधांचा पुरेसा साठा नसल्याचा तक्रारी यावेळेस करण्यात आल्या, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याचा आरोप केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.
आ. कुणावार यांनी सदर कार्यकर्त्यांची दखल घेत सर्वच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणाघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!