एक महिन्यापासून लाईन बंद , शेतकरी त्रस्त ; महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Byसाहसिक न्यूज24
देवळी प्रतिनिधी / सागर झोरे :
तालुक्यातील अजनावती विद्युत डीपी,दिघी शेत शिवारामधील शेतकरी वसंत गुलाबराव गाठे यांच्यासह पंधरा ते वीस शेतकऱ्यांची मागील एक महिन्यापासून शेतातील लाईन बंद असल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहे.वारंवार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देवळी येथे सातत्याने शेतकरी चक्रा मारत आहे. लेखी निवेदन सुद्धा दिलेले आहे परंतु महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अभियंता प्रशांत वाणी सतत शेतकऱ्यांना आज करतो उद्या करतो कर्मचारी हजर नाही कर्मचारी सुट्टीवर आहे असे म्हणत सर्व शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून टाळत आहे.परंतु आता त्या परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक मरन्या अवस्थेत आलेले आहे तरीसुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सतत शेतकर्यांकडे दूर्लक्ष करीत आहे.शेतकरी वसंतराव गाठे यांच्या शेतातील मीटर क्रमांक 392827000111हे असून त्यांनी नियमित वीज बिलाचा भरणा केलेला असून तरीसुद्धा त्यांच्यासोबत अशा प्रकारचा व्यवहार माझ्यासोबत का होत आहे असा प्रश्न त्यांनी आपल्या लेखी अर्जात केलेला आहे.जर माझे पिक नष्ट झाले तर याची पूर्ण जबाबदारी महावितरण कंपनी वर राहील असे त्यांनी आपल्या लेखी अर्जात म्हटले आहे.
मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे माझ्याकडे दिघी शेत शिवारामध्ये चार एकर ओलिताची शेती आहे मी माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरले आहे.परंतु गेल्या मागील एक महिन्यापासून माझ्या शेतातील लाईन बंद असल्यामुळे माझ्या शेतातील उभे सोयाबीनचे पीक पाण्याच्या अभावामुळे मरणे अवस्थेत आलेले आहे एक महिन्यापासून सतत महावितरण कंपनीचे चकरा मारून सुद्धा लेखी निवेदन देऊन सुद्धा वीज वितरण कंपनीचे अभियंता प्रशांत वाणी हे मला नाहाक त्रास देत आहे.जर माझ्या शेतातील सोयाबीनची उभे पीक नष्ट झाले तर यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देवळी हे जबाबदार राहील.
शेतकरी वसंत गुलाबराव गाठे देवळी
आमच्याकडे दिघी शेत शिवारातील काही शेतकऱ्यांचा लेखी अर्ज प्राप्त झालेला आहे त्या परिसरातील लाईन बंद असल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे काही कारण वास्तव मुळे आम्ही लाईन दुरुस्त करू शकलो नाही परंतु येत्या 24 तासात आम्ही लाईन पूर्णपणे दुरुस्त करू.
*अभियंता,प्रशांत वाणी. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देवळी*