कर्मयोगी श्री गाडगे बाबा संत दरबार वार्षिक पुण्यतिथी कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रमाद्वारे संपन्न.

0

आष्टी (शाहिद): नवीन आष्टी ( आयमा ) येथे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा तथा समर्थ सद्गुरू भाकरे बाबा या तिन्ही संतांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मागील 14 वर्षापासून सातत्याने 31 डिसेंबर पासून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात होत असते.रोजी 31 डिसेंबर या दिवशी मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत असा दिवस असल्याने या दिवशी सामाजिक उपक्रमा नीसाजरा केला जातो. याच दिवशी नवतरुण पिढी नव्या वर्षाचे स्वागत करण्यात फार उत्साही असते.रात्री जागरण करणे,नाच गाणे आणि सोबतीला मास मदिरा अश्या पद्धतीने पार्टी करून नव वर्षाचे स्वागत कॉलेज ची तरुणाई करते. असे चित्र आज पाहायला मिळत आहे. “संतांचे म्हणणे आहे, व्यसन मुक्त राहायचे आहे” या आशयाची व्यसनमुक्ती शपथ 1 जानेवारी रोजी लोकमान्य विद्यालय आष्टी चे अकरावी बारावीचे आर्ट सायन्स चे विद्यार्थी यांचे सोबत व्यसनमुक्ती बाबत चर्चा करून शपथ वाचन करण्यात आले.व 2 जानेवारी रोजी हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. या सोबतच ‘उच्च शिक्षणाच्या विविध संधी’ या विषयावर चर्चा सत्र पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे पुणे , मुंबई , दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक कोर्स ची माहिती देण्यात आली. भारतातील जगप्रसिद्ध टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस,जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, सर जे जे स्कुल ऑफ आर्ट, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, आय.एल.इस. लॉ कॉलेज पुणे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय नाट्य संस्थान दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, अशा विविध शैक्षणिक संस्था ची आणि अभ्यासक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली.. आष्टी शहरातील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आणि लोकमान्य विद्यालय येथील ज्युनिअर कॉलेजच्या ग्रामीण भागातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘टाटा समाज विज्ञान संस्थान’ 1938 ला स्थापन झालेल्या या संस्थेचे नाव मुलांनी पहिल्यांदाच ऐकल्याचे विद्यार्थी सांगत होते.बि. ए.- ग्रामीण विकास, बि. ए. -डेव्हलपमेंट स्टडीज असे विषय प्रथमच ऐकल्याचे अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितले.3 जानेवारी हा मुलींना शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘सावित्रीबाई फुले विचार मंथन लेखन स्पर्धा’ या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.यु ट्यूब हे गूगल चे प्रसिद्ध सोशल मीडिया चॅनेल आहे.. याचा शैक्षणिक उपयोगासाठी वापर कसा करायचा याबाबत विद्यार्थ्यां सोबत चर्चा करण्यात आली.. नॅशनल फिल्म अर्काइव्हज ऑफ इंडिया द्वारे निर्मित पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुस्तकावर आधारित “भारत एक खोज या सावित्रीबाई फुले यांचे जीवनावरील माहितीपट पाहून आपणास काय वाटले” असा लेखन स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला.. या करिता उत्कृष्ट 3 निबंधाना 1001 रु व एक होता कार्व्हर हे प्रसिद्ध चरित्रपुस्तक बक्षीस ठेवण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाची माहिती निसर्गा फौंडेशन चे संसाधन व्यक्ती श्री धनंजय सायरे यांनी अंतोरा, साहूर, आष्टी येथील उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांशी थेट सवांद साधून ही माहिती दिली. प्रसिद्ध लेखक गाडगे बाबा यांचे जीवनाचे चरित्रकार श्री संतोष अरसोड यांनी लिहलेल्या “सत्यशोधक गाडगेबाबा” या पुस्तकाचे रोज सायंकाळी वाचन करण्यात आले.. शेवटी 4 जानेवारी रोजी माध्यमिक दहाव्या वर्गाच्या परीक्षेत वर्धा जिल्ह्यातून प्रथम आलेला श्रीकांत मोहनराव निंभोरकर तसेच उच्च माध्यमिक बाराव्या वर्गातील प्रथम वैष्णवी निशीदकर लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थ्यांचा सन्मान 1001 रुपये. ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक आष्टी तालुक्याचे तहसीलदार श्री सतीश कुमावत व गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री महेश पाटील यांचे वतीने देण्यात आले.. या कार्यक्रमाचा शेवट प्रसिद्ध युवा महिला कीर्तनकार पूर्णिमाताई रा. पुलगाव यांचे सुमधुर वाणीने समाज जागरणाचे कीर्तन व महाप्रसाद करून करण्यात आले.. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कर्मयोगी संत गाडगे बाबा संत दरबार चे अध्यक्ष गजानन भोरे, सचिव उमेश सायरे, संस्थापक श्री गोविंदराव सायरे,विमलबाई सायरे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले..तसेच सर्व नवीन आष्टी ग्राम पंचायतचे ग्रामसेवक, ग्रामवासीयांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले..

नरेश भार्गव साहसिक न्यूज/24आष्टी शाहिद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!