कलाशिक्षक उत्तम वानखेडे यांची “आदर्श सुविचार चित्रावली” मध्ये पुन्हा एकदा विक्रमाची नोंद.

0

🔥लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून विश्वविक्रम प्रस्थापित केले

🔥पाचशेच्या वर चित्र सुविचार तयार करण्याचा वानखेडे यांचा विक्रम

सिंदी (रेल्वे) : स्थानिक केसरीमल नगर विद्यालयाचे उपक्रम प्रिय कलाशिक्षक उत्तम वानखेडे यांनी ब्रश व रंग यांच्या साह्याने तयार केलेले “आदर्श सुविचार चित्रावली” हे ६५० च्या वर तयार करून ( चिफ एडिटर आणि सीईओ OMG बुक ऑफ रेकॉर्ड) प्रोफेसर डॉ. दिनेश के. गुप्ता द्वारा OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पुन्हा एकदा विक्रमाची नोंद घेऊन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
असे म्हणतात “शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीता-शिकविता तो स्वतः देखील शिकत असतो. याच म्हणीप्रमाणे गेल्या 34 वर्षापासून कलाशिक्षक म्हणून उत्तम वानखेडे यांनी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध शिबिरे, विविध उपक्रम विविध स्तरावरील स्पर्धा-परीक्षा शासकीय रेखा कला परीक्षा, कला प्रदर्शन, भितीचित्र स्पर्धा, फलक लेखन अशा विविध कलेच्या दृष्टीने विद्यार्थी हित जोपासून त्यांच्यासाठी शाळेचे नाव तसेच शहराचे नाव हे तालुका, जिल्हा, राज्य, अखिल भारतीय नाही तर जागतिक पातळीवर विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून विद्यार्थ्यांना भरगोस बक्षीस प्राप्त करून देणारे कलाशिक्षक स्वतः देखील विविध स्पर्धा उपक्रम मध्ये सहभागी होऊ लागले. नवनवीन प्रयोग करू लागले. विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय सहभाग, अखिल भारतीय विद्याभारती शिक्षण संस्था दिल्लीद्वारा आयोजित अखिल भारतीय स्तरावरील नवीन राष्ट्रीय धोरण २०२० वर आधारित पोस्टर स्पर्धेत आदिवासी चित्र शैलीतील वारली चित्र/पोस्टरला भारतातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. अशा अनेक सामाजिक संस्थाद्वारा विविध पुरस्कार विविध स्तरांवर देखील प्राप्त केले. या सर्वांमध्ये कोणाचे साहाय्य न घेता स्वतः विविध सामाजिक कार्य, विद्यार्थी हिताचे, गाव हिताचे कार्य करत गेले.
कलाशिक्षक उत्तम वानखेडे यांनी “कोरोना -१९” च्या भयावह दिवसात शाळा बंद असल्यामुळे घरी रिकामे का बसावे? काहीतरी करावे म्हणून एक नवीन अतुलनीय उपक्रम हाती घेण्यात आला. तो म्हणजे “चित्ररूप सुविचार” लिहिण्याचा. हे चित्ररूप सुविचार रंग व ब्रशच्या साह्याने सुविचार लिहून व त्या सुविचाराला शोभेल किंवा सुविचाराला अनुसरून आपल्या कल्पने साजेचे हे चित्र काढून ते रंगविणे होय. आतापर्यंत पाचशेच्यावर चित्र सुविचार तयार करण्याचा विक्रम केल्यामुळे भारत व क्रोएशिया यांच्या संयुक्त विद्यमाने “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद करून वानखेडे यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला.
याआधी देखील आर्ट बिट्स, पुणे या संस्थेने ४०० च्या वर चित्र सुविचार तयार केल्यामुळे “इंडिया मास्टर अवार्ड” देऊन देऊन त्यांना गौरविण्यात आले. यापुढेही जवळजवळ १००० चित्र चित्ररूप सुविचार तयार करण्याचा मानस वानखेडे यांचा आहे. या कार्याचा गौरवामुळे मी धन्य झालो आहे. मी केलेल्या शिक्षण कार्यात मी पूर्णपणे समाधानी आहे. हा अवॉर्ड मला घडविणारे माझे आई-बाबा यांना समर्थित करीत आहे असे कलाशिक्षक उत्तम वानखेडे बोलतांना म्हणालेत.
या गुण-गौरवात नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अतुल टालाटुले, सचिव राजू पात्रीकर, उपाध्यक्ष हरिभाऊ वजुरकर, कोषाध्यक्ष अशोक दवंडे, सदस्या नीता टालाटुले, सदस्या देशपांडे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक विलास एखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर, तसेच पुरुषोत्तम रिंगे व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सर्व पत्रकार मंडळी, व्यापारी वर्ग, पालक वर्ग सामाजिक वर्ग अशा सर्व स्तरावरून उपक्रम प्रिय कलाशिक्षक उत्तम वानखेडे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!