🔥कान्हापूर येथे दुचाकीची जोरदार धडक; दोघे जखमी🔥जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले
सेलू -/ कान्हापूर येथे दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी झाल्याची घटना आज रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. महेश सुभाषराव बिडवे (वय४५) रा. म्हाडा कॉलनी, वर्धा हे दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाची देवेंद्र विश्वनाथ शेंडे (वय५५) रा. खानापूर यांना धडक बसली. या अपघातात दोघेही जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने मदत करून पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील दुचाकीचा क्रमांक MH 32 AA 1998 असा असून, अपघातामुळे परिसरात काही काळ गर्दी झाली होती. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरली.